Raveena Tnadon Post: सध्या सर्वत्र झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज' या चित्रपटाची चर्चा आहे. 'द आर्चीज' हा सिनेमा 7 डिसेंबर 2023 रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत नेटकऱ्यांच्या अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांना हा चित्रपट आवडला, तर अनेकांनी स्टार किड्स सुहाना खान, खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्या अभिनयावर टीका केली.
या चित्रपटात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा झोया यांच्या अभिनयावर अनेकांनी टीका केली. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांचे सीन शेअर करून दोघांची खिल्ली उडवली आहेत.
मात्र रविनाने ही खिल्ली उडवणारी पोस्ट लाईक केली. त्यानंतर सोशल मिडियावर या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला. या व्हिडिओवर लिहिले होते, "अभिनय इथेच मरण पावला".
तर नेटकऱ्यांनी हा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, "रवीनालाही सहमत आहे." असं म्हणत ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्यानंतर रवीना वादात सापडली. आता या पोस्टबाबत रवीनाने स्पष्टीकरण दिले आहे. तिने पोस्ट शेयर करत पोस्ट चुकून लाईक झाल्याचे सांगितले.
रवीना टंडनने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले की, "टच बटण आणि सोशल मीडिया, एक चूक झाली आहे. हे चुकून लाईक केलं गेलं आणि मला माहित नसताना, स्क्रोल करताना ते लाईक झालं. गैरसोयीबद्दल आणि दुखावल्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते."
आता सध्या सोशल मिडियावर रविनाची ही पोस्ट व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टला कमेंट करणे सुरु केले आहे. 'द आर्चीज'मधून खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा यांच्याशिवाय शाहरुख खानची मुलगी सुहाना खाननेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.
सुहाना, खुशी आणि अगस्त्य व्यतिरिक्त या चित्रपटात वेदांग रैना, डॉट, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा देखील चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटातील वेदांग रैनाच्या अभिनयाचे खूप कौतुक केले जात आहे. हा चित्रपट 7 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.