ravindra berde death ravindra and laxmikant berde marathi natak shantecha karta chalu ahe SAKAL
मनोरंजन

Ravindra Berde: रविंद्र - लक्ष्मीकांत यांच्या जोडीने या नाटकातून रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ केला

रविंद्र बेर्डे यांचं आज दुःखद निधन झालंय

Devendra Jadhav

Ravindra Berde News: रविंद्र बेर्डे यांचं आज वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. रविंद्र बेर्डे यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

रविंद्र बेर्डे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. लक्ष्मीकांत - रविंद्र या दोघांनीही एकत्र अनेक सिनेमांंमध्ये काम केलंय. पण या दोघांनी मराठी रंगभूमीही गाजवलीय. जाणून घेऊ.

रविंद्र - लक्ष्मीकांत यांच्या जोडीने गाजवली रंगभूमी

रविंद्र बेर्डे - लक्ष्मीकांत बेर्डे या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. धडाकेबाज, चंगू मंगू, माझा छकुला अशा अनेक सिनेमांमध्ये रविंद्र - लक्ष्मीकांत जोडीने मराठी सिनेसृष्टीत स्वतःची छाप पाडली.

केवळ चित्रपट नाही तर एका नाटकातून त्यांनी मराठी रंगभूमीवर अक्षरशः धुमाकुळ केला. हे नाटक म्हणजे शांतेचं कार्ट चालू आहे.

या नाटकात रविंद्र - लक्ष्मीकांत एकत्र काम करायचे. या दोघांच्या अफलातून विनोदी जुगलबंदीने लोकं खळखळून हसायचे. या नाटकात रविंद्र - लक्ष्मीकांत यांच्यासोबतच नयनतारा, सुधीर जोशी असे दिग्गज कलाकार होते.

रविंद्र बेर्डे यांचे सिनेमे

रविंद्र बेर्डे यांनी मराठी चित्रपट आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, हाच सुनबाई चा भाऊ यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केले होते.

रविंद्र बेर्डेंच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदाचा तारा आपण गमावला, अशी प्रत्येकाची भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT