Ravindra Dhangekar and chandrakant patil new song Champabai Dhangekarla Jiva Thoda Lav pune kasba election sakal
मनोरंजन

Ravindra Dhangekar: अगं चंपाबाई.. धंगेकरला जीव थोडा लाव.. या गाण्यानं पुण्यात उडवलाय धुरळा.. ऐकाच!

राजकीय धुरळा मांडणारं हे गाणं प्रत्येकाला नाचायला भाग पाडतंय..

नीलेश अडसूळ

Ravindra Dhangekar and Chandrakant Patil Political Dispute Song: पुण्याततील गाजलेल्या आणि वाजलेल्या निवडणूकीचा धुरळा नुकताच शांत झाला. गेल्याच महिन्यात पुण्यामध्ये पोट निवडणुका झाल्या. यामध्ये कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात चुरशीची लढत होती.

यामध्ये धंगेकर यांनी मोठा विजय प्राप्त केला. हा विजय मोठा ऐतिहासिक होता. यावर आता एक भन्नाट गाणं आलं असून.. या गाण्याने कसब्यासह पुण्यामध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

(Ravindra Dhangekar and chandrakant patil new song Champabai Dhangekarla Jiva Thoda Lav pune kasba election)

झाले आहे की, रवींद्र धंगेकर यांना कसब्यात धूळ चारण्यासाठी भाजपने मोठी यंत्रणा उभारली होती. अगदी देशाचे गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील २०-२५ मंत्री महाराष्ट्रातील 65 आमदार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे महापालिकेतील ९० पेक्षा जास्त नगरसेवक या प्रचारत सामील झाले होते.

पण हा सर्व लवाजमा पालथा करत रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या रासने यांच्या पराभव केला आणि कसबा महाविकास आघाडीला मिळवून दिला. यावेळी रवींद्र धंगेकर यांच्यावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली होती.

'हू इज धंगेकर' असं चंद्रकांत पाटील माध्यमा समोर म्हणाले होते. पण आता याच निवडणुकीचं संपूर्ण समाचार घेणारे आणि धंगेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करणारे एक धमाल गाणे काही ग्रामीण कलाकारांनी तयार केले आहे.

'एकजुटीनं... साऱ्यांच्या मतानं.. कसा उधळून लावलाय डाव.. अगं चंपाबाई धंगेकरला जीव थोडा लाव' असे या गाण्याचे गमतीशीर शब्द आहेत. या गाण्याचे गायक प्रदीप कांबळे आहेट तर उमेश -प्रदीप यांनी हे गीत लिहिले आहे. या भन्नाट गाण्याचे संगीत उमेश गवळी केले असून प्रत्येकाला नाचायला भाग पाडणारे असे हे गाणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

सुखविंदर सिंग आणि पुण्याचं आहे खास कनेक्शन, म्हणतात- इथे आलो की कधीच गाडीने फिरत नाही कारण...

Latur Assembly Election 2024 : देशमुख विरुद्ध चाकूरकरांमध्ये सरळ लढत, लातूर शहर मतदारसंघात २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT