Ravindra Mahajani Post Mortem Report News: मराठी मनोरंजन विश्वात आज धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनींचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं. रविंद्र यांचा मृतदेह घरातच होता.
२ दिवसानंतर शेजाऱ्यांना वास आला आणि त्यांनी पोलीसांकडे तक्रार केली. शेवटी पोलीसांनी दार तोडल्यावर रविंद्र महाजनी आत मृतावस्थेत आढळले. निधनानंतर रविंद्र महाजनींचा पोस्ट मॉर्टम रिपोर्ट समोर आलाय. यातुन महत्वाची माहिती उघडकीस आलीय.
(ravindra mahajani after death post mortem report gives important information )
काय आहे पोस्ट मॉर्टम रिपोर्ट?
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांनी अहवाल सांगीतला आहे.. यात ते म्हणतात, पोस्ट मॉर्टम रिपोर्ट च्या प्राथमिक अहवालात रवींद्र महाजनी यांच्या शरीरावर कोणत्याही तीक्ष्ण खुणा अथवा जखमा नसल्याचं समोर आलं आहे.
महाजनी यांचा मृत्यू गुरुवारी १३ जुलै रोजी सकाळी झाला असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या प्रकरणी व्हिसेरा मात्र राखून ठेवण्यात आला आहे.
ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी राहत्या घरात शुक्रवारी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर जखमा आढळल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू गुरुवारी झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे
रविंद्र महाजनींच निधन
पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील एक्सरबीया सोसायटी, MIDC रोड, आंबी येथे भाड्याच्या घरात महाजनी राहत होते. त्यांचा मृतदेह येथील बंद फ्लॅटमध्ये मिळून आला आहे.
मृत्युच्या आधी ७-८ महिन्यांपासून या ठिकाणी एकटेच राहत होते. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता.
रविंद्र महाजनींची समृद्ध कारकीर्द
अभिनेते रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला, त्यानंतर त्यांचं बालपण हे मुंबईत गेलं. त्यानंतर पुढे रवींद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.
तसेच त्यांनी भूमिका साकारलेले लक्ष्मी ( १९७८), दुनिया करी सलाम (१९७९), गोंधळात गोंधळ (१९८१), मुंबईचा फौजदार (१९८५) हे चित्रपट विशेष गाजले. त्यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.