nagraj manjule, akash thosar, sayaji shinde, Ghar Banduk Biryani, Ghar Banduk Biryani news SAKAL
मनोरंजन

Ghar Banduk Biryani: क्या बात है..! घर बंदूक बिरयानी सिनेमात झळकणार खरेखुरे पोलीस

'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे

Devendra Jadhav

Ghar Banduk Biryani News: सध्या जोरदार चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'घर बंदूक बिरयानी'. आतापर्यंत हा चित्रपट कशावर आधारित आहे, याची प्रेक्षकांना कल्पना आली असेलच.

मुळात नागराज मंजुळे यांचा चित्रपट म्हणजे चौकटीबाहेरचा चित्रपट, हे आता समीकरणच बनले आहे. या चित्रपटात नागराज पोपटराव मंजुळे यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली असून ते एका तडफदार, प्रामाणिक पोलीस अधिकाराच्या भूमिकेत झळकत आहेत.

(real police officers acted in nagraj manjule ghar banduk biryani )

त्यांचा हा 'ॲक्शन हिरो'चा अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.

या चित्रपटात नागराज मंजुळे यांचे जे सहकारी पोलीस अधिकारी आहेत, त्यातील काही पोलीस हे खऱ्याखुऱ्या आयुष्यातही पोलीसच आहेत. त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातून रिअल पोलीस रिलमध्ये दिसणार आहेत.

नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात प्रेमकथा असली तरी ते चित्रपट एका विशिष्ट विषयावर भाष्य करणारे, वेगळ्या धाटणीचे असतात.

यात नवोदितांना संधी देणे, अभिनयात गावकऱ्यांना प्राधान्य देणे ही नागराज मंजुळे यांची खासियतच असते. त्या विषयाला वास्तविकतेचा स्पर्श व्हावा, तो विषय प्रेक्षकांना आपल्या जवळचा वाटावा, यासाठी त्यांचा हा प्रयत्न असतो.

हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' ही त्याला अपवाद नाही. या चित्रपटात पोलीस आणि डाकूंची चकमक दिसत आहे. हे डाकू हुबेहूब दिसावेत, यासाठी महाराष्ट्रातील विविध भागांतील कलाकार ज्याप्रमाणे त्यांनी वेचले.

त्याप्रमाणेच पोलीसही खरे वाटावेत, म्हणून त्यांनी काही रिअल पोलिसांनाच अभिनयाची संधी दिली. यात कोणी त्यांचा भाऊ आहे, कोणी मित्र आहेत. त्यामुळे आता इतर चित्रपटांप्रमाणेच हा चित्रपटही रिअॅलिस्टिक असणार, हे नक्की!

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित 'घर बंदूक बिरयानी' हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर, सायली पाटील, दीप्ती देवी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT