Raj Thackeray News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायमच कला आणि संस्कृती विषयक गोष्टींना पाठिंबा देत असतात. नुकत्याच राज ठाकरेंच्या घरी मराठीतील सुप्रसिद्ध कन्टेन्ट क्रियेटर यांनी भेट दिली.
यामध्ये मराठीतला लाडका कन्टेन्ट क्रियेटर सिद्धांत सरफरे (Siddhant Sarfare) सुद्धा सहभागी होता. सिद्धांत सरफरेने राज ठाकरेंना भेटल्यावर त्याला आलेला भन्नाट अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे.
(reel star siddhant sarfare shared experience after meeting raj thackeray)
सिद्धांत जेव्हा शिवतीर्थावर राज ठाकरेंना भेटायला गेला, तेव्हा राज ठाकरेंनी त्याचे व्हिडिओ काळजीपूर्वक बघितलं.
त्याच्या कन्टेन्ट बद्दल त्याला राज ठाकरेंनी अनेक प्रश्न विचारलेले दिसले. यावेळी राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे सुद्धा उपस्थित होता. अमेय खोपकर यांनी हि भेट आयोजित केली होती.
या अविस्मरणीय अनुभवाबद्द्ल सिद्धांत सरफरे म्हणाला.. "आजचा दिवस नेहमी लक्ष्यात राहण्यासारखा आहे, सकाळी ठीक 11:30 वा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष माननीय राज साहेब ठाकरे आणि परिवार यांच्या घरी शिवतीर्था वर खूप गप्पा गोष्टी रंगल्या.
आज त्यांनी वेळात वेळ काढून कॉन्टेन्ट क्रियेटर्स सोबत गप्पा मारल्या.. आम्ही कसे व्हिडिओज करतो त्या बद्दल त्यांनी जाणून घेतलं. आमचे व्हिडिओ बघितले आणि मुळात ते आज आम्हांला एक कलाकार म्हणून भेटले.
खूप काही शिकायला मिळालं आजचा दिवस मी कधीच विसरणार नाही." अशी पोस्ट लिहून सिद्धांतने त्याला आलेला अनुभव शेयर केलाय.
राज ठाकरेंच्या घरी काल ११.३० वाजता सिद्धांत सरफरे सोबतच नील सालेकर, सौरभ घाडगे, करण सोनवणे, शुभम जाधव, श्रवण शिरसागर, शंतनु रांगणेकर, नीलराज कदम, निखिल धाडवे, तेजस गायकवाड, धनंजय पवार, मनमीत पेम आणि अंकिता वालावलकर उपस्थित होते.
सगळ्या कन्टेन्ट क्रियेटर्सनी राज ठाकरेंसोबत मनसोक्त गप्पा मारल्या आणि धम्माल केली.
याप्रसंगी अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांनीही सर्वांसोबत गप्पा मारल्या आणि त्यांचं काम जाणून घेतलं. सर्वांसोबत राज ठाकरेंनी फोटो काढले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.