Remo D'Souza  
मनोरंजन

Viral Video: म्हणायचे होते रेमडेसिव्हीर पण तोंडून निघालं भलतंच...

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर!

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाने Remo D'Souza सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण मुलगा मुलाखत देताना दिसत आहे. महागाईबद्दल बोलताना तो मुलगा म्हणतो, 'सिपला कंपनीचे इंजेक्शन रेमो डिसूजा.' हे वाक्य ऐकून सगळे हसायला लागतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रेमोने हा व्हिडीओ शेअर करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Remo D'Souza reacts to viral video of man calling Remdesivir Remo D'Souza)

रेमोने एका मुलाखतीत सांगितले, 'मी या व्हिडीओमध्ये जे ऐकलं त्याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता. मी हा व्हिडीओ माझ्या पत्नीला दाखवला तर तीसुद्धा पोट धरून हसत होती. मला रेमडेसिव्हीरचा Remdesivir उच्चार नीट करता येत नव्हता. या इंजेक्शनच्या नावाने मला बरेच दिवस गोंधळात टाकले होते. व्हिडीओमधील या तरूणाने इंजेक्शनला नवे नाव दिले. आता रेमो डिसूझा हेच नाव मी या इंजेक्शनला देणार आहे.' रेमोने सांगितले की त्याने हा व्हिडिओ त्याच्या मुलालादेखील दाखवला. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याचा मुलगा म्हणाला, 'बाबा तो बरोबर बोलत आहे, काय चुकलं?' मी जेव्हा त्याला समजावून सांगितले तेव्हा त्याच्या लक्षात आले आणि मग तो हसला.'

गेल्या वर्षी रेमोला हृदयविकाराचा झटका आला होता. या कठीण परिस्थितीत अभिनेता सलमान खानने त्यांना मदत केली होती. रेमोने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अनेक डान्सच्या शोमध्ये तो परिक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे. रेस-3, एबीसिडी, रेस-3, स्ट्रीट डान्सर-3 या चित्रपटांचे दिग्दर्शन रेमोने केले आहे. तसेच डान्स प्लस, डान्स इंडिया या शोचे परीक्षण केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT