Rakesh Master Passes Away: Esakal
मनोरंजन

Rakesh Master Passes Away: प्रसिद्ध कोरिओग्राफरचे वयाच्या 53व्या वर्षी गंभीर आजाराने निधन..

Vaishali Patil

Rakesh Master Passes Away: तेलगू चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कोरिओग्राफरपैकी एक, राकेश मास्टर यांचे निधन झाले आहे. त्यांनी रविवारी वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

 राकेश मास्टर यांच्या निधनाच्या बातमीने साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. कोरिओग्राफरच्या निधनावर सर्व सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी राकेश मास्टर विशाखापट्टणममध्ये शूटिंग करत होते आणि नुकतेच हैदराबादला परतले होते. हैदराबादला परतल्यानंतर ते आजारी पडले. त्यानंतर त्यांची प्रकृती खुपच ढासाळली त्यांमुळे त्यांना हैदराबादच्या गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही.

रविवारी संध्याकाळी राकेश यांनी अखेरचा श्वास घेतला.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार राकेशच्या अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. त्यांना metabolic acidosis या गंभीर आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

राकेश मास्टरचा तेलुगू सिनेमांच्या गाजलेल्या गाण्यांचे कोरिओग्राफिंग केले होते. नृत्य पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील .

दिवंगत कोरिओग्राफर राकेश मास्टर यांनी आपल्या करिअरची सुरुवात 'आटा' आणि 'धी' यांसारख्या डान्स रिअॅलिटी शोमधून केली होती. 

त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांनी सुमारे 1,500 चित्रपटांसाठी कोरिओग्राफर म्हणून काम केले आणि अनेक हिट गाणी दिली. 

राकेश मास्टर यांच्या अकाली निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. तेलुगु इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे शोक व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट शेयक केली आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती मिळावी यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांचे उपोषण सुरू; काँग्रेस,‘आप’सह विरोधी पक्षांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

CIDCO Lottery: नवी मुंबईत सिडकोच्या 26 हजार घरांची 'या' तारखेला निघणार लॉटरी; बोर्ड मिटींगमध्ये ठरला मुहूर्त

Pune : कोंढवा पोलीस ठाण्यात इम्तियाज यांच्याविरोधात आंदोलन; गुन्हा दाखल करण्याची मागणी

Pune Viral Video: कारची काच खाली करायला सांगितलं.. लाथा घातल्या; ऑटोरिक्षा चालकाच्या दादागिरीचा व्हिडिओ व्हायरल

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT