Ek Thi Begum 2  
मनोरंजन

पतीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परत आलीये बेगम

३० सप्टेंबरपासून 'एक थी बेगम २' एमएक्स प्लेअरवर

स्वाती वेमूल

प्रेम तुम्हाला अनपेक्षित गोष्टी करण्यास भाग पाडते. परंतु सूडबुद्धीची आग तुम्हाला अशा काही गोष्टी करण्यास भाग पाडते, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. बहुप्रतीक्षित 'एक थी बेगम'चा Ek Thi Begum 2 दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. पहिल्या सिझनमध्ये अनुजा साठेने Anuja Sathe अशरफ भाटकरची भूमिका साकारली होती. आता दुसऱ्या सिझनमध्ये ती लीला पासवानच्या भूमिकेत असेल. मकसूदचे बेकायदेशीर साम्राज्य उलथवून टाकण्याचा आणि तिचा पती झहीरच्या (अंकित मोहन) मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रतिज्ञेचे पालन करत, ती या सिझनमध्ये निर्भयपणे पुरुषांच्या जगात वर्चस्व गाजवताना दिसणार आहे. सत्तेतील प्रत्येकजण तिच्या शोधात आहे. अंडरवर्ल्ड, पोलीस आणि राजकारणी असे सगळेच.

सिझन १ मध्ये अशरफच्या आयुष्यावर भाष्य करण्यात आले आहे. ज्यात तिचा पती झहीर, एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन मकसूदचा (अजय गेही) विश्वासू होता, जो मारला गेला. त्यानंतर अशरफ सपना या नावाने बार डान्सर बनून झहीरच्या हत्येसाठी जबाबदार ठरलेल्या प्रत्येकाला मारण्याची योजना आखते. मात्र तिच्या योजना निष्फळ ठरतात आणि सिझन १चा शेवट अशा एका टप्प्यावर येतो जिथे अशरफ जिवंत राहणार की नाही, हा प्रश्न उद्भवतो. सिझन २ची सुरुवात लीला पासवानच्या शोधाने होते. अशरफने घातलेला आणखी एक वेष ज्यात, ती मृत्यूला पराभूत करून दुबईच्या भयानक आणि शक्तिशाली डॉनला गुडघ्यावर आणण्याच्या तिच्या ध्येयाकडे परतते.

लेखक, दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणतात, “गुन्हेगारी विश्वाने मला नेहमीच आकर्षित केले आहे. सिझन २ मध्ये सूड उगवण्याची भावना, ज्या गोष्टींच्या तुम्ही विरोधात आहात, त्याच गोष्टी करणे आणि या गोष्टी करताना तुम्हाला तुमच्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या लोकांची किंमत मोजावी लागणे, हे दाखवण्यात आले आहे.'' तर अनुजा साठे म्हणते, ''सर्वात शक्तिशाली लोक ते असतात, ज्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नसते. तिच्यासाठी, तिच्या प्रेमासाठी जे सर्वात महत्वाचे होते, ते माझ्या व्यक्तिरेखेने आधीच गमावले आहे. आपल्या पतीचा बदला घेण्यासाठी आणि तिची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी तिने कोणत्याही थराला जाण्याचा निर्धार केला आहे. तिची अडथळ्यांवर मात करण्याची दृढता आजच्या स्त्रियांच्या लढाईचे प्रतिनिधित्व करणारी आहे. हा प्रवास माझ्यासाठी खरोखरच खूप खास आणि संस्मरणीय आहे."

सचिन दरेकर आणि विशाल मोढावे दिग्दर्शित या सीरिजमध्ये शहाब अली, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, रेशम श्रीवर्धनकर, राजेंद्र शिसटकर, नझर खान, हितेश भोजराज, सौरासेनी मैत्रा, लोकेश गुप्ते, मीर सरवर, पूर्णनदा वांडेकर आणि रोहन गुजर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एमएक्स ओरिजनल सीरिज 'एक थी बेगम २' चे सर्व भाग प्रेक्षकांना ३० सप्टेंबरपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT