rhea chakraborty 
मनोरंजन

रिया चक्रवर्ती चौकशीसाठी ४ दिवसात दुस-यांदा पोहोचली ईडीच्या कार्यालयात,आज होणार 'त्या' १५ कोटींचा खुलासा?

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- सुशांत सिंह राजपूत केसमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास करण्यासाठी रिया चक्रवर्तीला ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवलं आहे. रिया त्याचा भाऊ शौविक आणि वडिल यांच्यासोबत ईडी कार्यालयात काही वेळापूर्वी पोहोचली आहे. ईडीने रियाला ११ वाजण्याच्या आसपास बोलवलं होतं. याचदरम्यान असं ऐकायला मिळतंय की सुशांतने रियाला लाखोंचं गिफ्ट दिलं होतं. आता या दिशेने चौकशी होऊ शकते.

या गिफ्ट्सबाबत आता ईडी रियाची चौकशी करु शकते. ईडीने रियाची शुक्रवारी देखील चौकशी केली होती ज्यामध्ये रियाने सांगितलं होतं की मी देखील त्याला भेटवस्तु दिल्या होत्या. रियाची सुशांतच्या दोन कंपनीबाबतही चौकशी होणार आहे. या कंपनींचा डिरेक्टर रियाचा भाऊ शौविक आहे. शुक्रवारी ईडीने रियाची ८ तास चौकशी केली होती. आता आज सोमवारी तिची आणखी चौकशी होणार आहे. यासोबतंच रियाचा भाऊ शौविकची शुक्रवारी ईडीने जवळपास १८ तास चौकशी केली होती. 

याआधीच्या ईडीच्या चौकशीमध्ये अशी माहिती समोर आली होती की, रियाने तिचा एक फोन नंबर सांगितला नव्हता जो ती वापरत होती. जेव्हा ईडीने दुस-या फोनचे कॉल रेकॉर्ड रियाला दाखवले तेव्हा तिने ती दुसरा फोन वापरत असल्याचं मान्य केलं. ईडीने रियाच्या केलेल्या पहिल्या चौकशीत हे समोर आलं होतं की, रियाने २०१८मध्ये ८५ लाख रुपयांचं घर मुंबईतील खारमध्ये घेतलं होतं. ज्यासाठी तिने बँकेकडून लोन देखील घेतलं होतं. हे घर खरेदी करण्यासाठी तिने २५ लाख रुपये तिच्या सेव्हिंग्समधून दिले होते. यासोबतंच अशी माहिती कळतेय की २०१९ मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या अकाऊंटमध्ये ५० कोटी रुपये होते त्यातील आता केवळ १ कोटी पेक्षा थोडी जास्त रक्कम शिल्लक आहे.

यादरम्यान सुशांतच्या अकाऊंटमधून रिया आणि शौैविकच्या अकाऊंटला पैसे ट्रान्सफर झालं असल्याचं समोर येतंय. त्यामुळे रियाच्या आजच्या चौकशीत तिच्यावर १५ कोटींची अफरातफर केल्याचा जो आरोप होता त्याचा हिशोब लागू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.    

rhea chakraborty face enforcement directorate again in sushant singh rajput death case  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT