मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. रियाला ट्रोलर्स सुशांतच्या आत्महत्येसाठी दोषी देखील ठरवत आहेत. यावर रिया आत्तापर्यंत गप्प होती मात्र आता तिला सोशल मिडियाच्या माध्यमातून धमक्या येऊ लागल्या आहेत.
सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांतच्या आत्महत्येसाठी जबाबदार धरत मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जातंय मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने अखेर रियाने मौन सोडलंय. सोशल मिडियावर तिला ट्रोल करणा-यांना तिने आता चांगलंच सुनावलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर तिला धमक्या येऊ लागल्या आहेत. रियाने अशाच एका मेसेजचा स्क्रीनशॉट सोशल मिडियावर शेअर केला आहे.
या मेसेजमध्ये ट्रोलरने लिहिलंय, जर रियाने आत्महत्या केली नाही तर तिच्यावर बलात्कार होईल आणि तिला जीवे मारण्याची देखील धमकी दिलेली दिसून येतेय. रियाने स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलंय, 'मला पैशांसाठी फसवणारी म्हटलं गेलं, मी गप्प बसले, मला खूनी म्हटलं गेलं मी गप्प बसले, माझ्या चारित्र्यावर चिखलफेक केली गेली मी गप्प बसले. माझ्या या गप्प बसण्याने तुम्हाला हा अधिकार कोणी दिला की जर मी जीव नाही दिला तर तु माझा बलात्कार आणि खून करशील? तु जे म्हटलं आहेस त्याचं गांभीर्य तुला माहित आहे का? हा एक गुन्हा आहे आणि कायद्याप्रमाणे तुम्ही कोणाचाही असा छळ करु शकत नाही.' रियाने ही पोस्ट करण्यासोबतंच सायबर क्राईम हेल्पलाईनलाही टॅग केलं आहे. तसंच यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, रिया सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि अनेक दिवसांपासून दोघे एकत्र देखील राहत होते. सुशांतच्या आत्महत्येआधी काही दिवस ती त्याच्या घरुन निघून गेली होती. रियाने सांगितलं होतं की सुशांतने तिला जायला सांगितलं होतं. सुशांतच्या मृत्युनंतर तिचा जबाब देखील नोंदवण्यात आला आहे. जवळपास ११ तास तिची चौकशी करण्यात आली होती.
rhea chakraborty getting rape and murder threats after sushant death she posts screenshot
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.