riyah chakraborti  Team esakal
मनोरंजन

'सुशांत मादक पदार्थांचे सेवन करायचा, घरच्यांना होतं माहिती'

रियानं सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या (bollywood actor sushant singh rajput) आत्महत्येला (sucide) आता एक वर्षे पूर्ण होणार आहे. यानिमित्तानं एनसीबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी सुशांतचा जवळचा मित्र सिध्दार्थ पिठानीला (siddharth pithani) अटक केली होती. याशिवाय काही मोठे अपटेड्सही याप्रकरणात समोर आले आहेत. सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचं एक महत्वाचं स्टेटमेंट चार्चशीटमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिनं आता जी माहिती दिली आहे त्यामुळे ती चर्चेत आली आहे. (rhea chakroborty statement ncb important points sushant singh rajput murder drugs angle)

रियानं सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबाबत एक मोठा खुलासा केला आहे. त्यात काही प्रश्नांवरुन चर्चाही करण्यात आली आहे. रिया म्हणाली, सध्या जे प्रिस्क्रिप्शन व्हायरल होते आहे ते डॉक्टर निकिता यांचे होते. तसा उल्लेखही त्यात करण्यात आला आहे. रियानं लिहिलं आहे, सुशांतचं वागणं त्यावेळी बदललं होतं. आणि त्याची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती. त्याचं ते वागणं पाहून शोविकही चिंतित झाला होता.

क्लोमेनझेपेनचे साईड इफेक्ट काय आहेत याची चर्चा आम्ही सर्वजण करत होतो. आम्ही डॉक्टर निकिताशी चर्चाही केली. तिनं आम्हाला गुगल डॉक्टर बनण्याचा प्रयत्न करु नका असेही सांगितले. 8 जुल 2020 मध्ये सुशांतला व्हाट्स अप वर त्याच्या बहिणीकडून एक मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये असा उल्लेख त्यात त्याच्या उपचारासाठीच्या गोळ्यांचा उल्लेख होता.

सुशांत जे काही करत होता ते त्याच्या घरच्यांना माहिती होते. त्याचे घरच्यांशी बोलणे व्हायचे. अनेक मेसेज त्यासंदर्भात असल्याचेही रियानं सांगितले आहे. ड्रग्ज घेण्यामुळे त्याचा कधीही मृत्यु झाला असता. त्यावेळी त्याची बहिण 8 ते 12 जूनच्या दरम्यान त्याच्यासोबत राहत होती. 18 वर्षे पूर्ण केलेला सुशांत हा तेव्हा मरिर्जुनाचे सेवन करत होता. ते कुणाच्याही परवानगी शिवाय. जेव्हा त्याची आणि माझी भेट झाली तेव्हाही त्याचे हे सेवन सुरु असल्याचे रियानं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम टपाली मतपत्रिका मोजणी अमित ठाकरे आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT