Richard Moll dies at 80 best known for his role as Bull Shannon in Night Court  SAKAL
मनोरंजन

Richard Moll: 'नाईट कोर्ट' फेम ज्येष्ठ अभिनेते रिचर्ड मोल यांचं वयाच्या ८० व्या वर्षी निधन

रिचर्ड मोल यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे

Devendra Jadhav

'नाईट कोर्ट' अभिनेता रिचर्ड मोल यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्याच्या प्रतिनिधीने PEOPLE या वृत्तवाहिनीला सांगितले की,

गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी बिग बेअर लेक येथील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोल यांचा जन्म कॅलिफोर्नियातील पासाडेना येथे झाला. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले येथून इतिहासात पदवी प्राप्त केली.

त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 1984 ते 1992 या कालावधीत नाईट कोर्ट मालिकेत बुल शॅननच्या या व्यक्तिरेखेसाठी ते प्रसिद्ध होते. (Latest Marathi News)

या भूमिकेसाठी मोल यानी मुंडण केले होते. मोल यांनी रंगवलेली ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली.

2022-23 सीझनसाठी NBC वर नाईट कोर्ट नव्याने चित्रीत करण्यात आली होते, परंतु त्यात मोल यांचा सहभाग नव्हता. (Latest Entertainment News)

हाऊस सिरीजसाठी मोल यांना 1985 मध्ये Sauturn पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. याशिवाय त्यांनी द अॅडव्हेंचर्स ऑफ बॅटमॅन अँड रॉबिन हार्वे डेंट/टू-फेस, तसेच स्कॉर्पियन ऑन स्पायडर-मॅन: द अॅनिमेटेड या सिरीजला आवाज दिला आहे. मोल यांना हॉलिवुडमधी अनेक कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

BJP With Mns: शिवडीत मनसेच्या बाळा नांदगावकरांना भाजपचे समर्थन, आशीष शेलारांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT