Rishab Shetty esakal
मनोरंजन

Rishab Shetty : 'ओटीटी वाल्यांनो तुमचं काही खरं नाही! कांताराच्या ऋषभनं उपटले कान, आमच्या कन्नड चित्रपटांना...

दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी त्याच्या कांतारा चित्रपटानं तुफान लोकप्रिय झाला होता.

युगंधर ताजणे

Rishab Shetty Actor Kantara 2 Interview : दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टी त्याच्या कांतारा चित्रपटानं तुफान लोकप्रिय झाला होता. त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाईही केली होती. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या चित्रपटाची चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वी कांतारा चॅप्टर १ चा टीझर समोर आला आहे. तो चाहत्यांना आवडला आहे.

कांताराच्या पहिल्या चित्रपटानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. त्याची बॉलीवूडमध्ये क्रेझ होती. बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी ऋषभचे कौतुक केले होते. ऋषभनं त्या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवामध्ये ऋषभनं त्याच्या मुलाखतीतून प्रेक्षकांपुढे एक मोठी गोष्ट मांडली. ऋषभनं ओटीटी आणि ओटीटी मेकर्सवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

ऋषभनं त्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, ओटीटी प्लॅटफॉर्मचे मेकर्स हे कन्नड चित्रपटांना दुय्यम वागणूक देतात. कन्नड भाषेतील चित्रपट ज्या प्रमाणात ओटीटीवर प्रदर्शित व्हायला पाहिजे तसे ते होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक मोठे प्रश्न तयार झाले आहेत. त्यांनी कन्नड चित्रपटांना ओटीटीवर प्रदर्शित करण्यावर भर द्यायला हवा. अन्यथा ओटीटीचे काही खरे नाही. अशा शब्दांत ऋषभनं त्याची खंत मांडली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मच्या मेकर्स आणि निर्माते यांनी असे वागणे हे चांगले संकेत नाही. कन्नड चित्रपटांना सहजासहजी ओटीटी प्लॅटफॉर्म मिळत नाहीत. त्यामुळे त्या भाषेतील प्रेक्षकांची नाराजी आहे. कन्नडमध्ये देखील चांगला कंटेट असून त्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. कोरोनाच्या काळात ओटीटीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता मात्र ते काही बाबतीत मनमानी करत आहेत. असे ऋषभचे म्हणणे आहे.

ज्या चित्रपटांना थिएटरमध्ये तुलनेनं कमी प्रतिसाद मिळाला आहे त्यांना ओटीटीवर प्रदर्शित केले पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. असेही ऋषभनं म्हटले आहे. त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तो आता कांताराच्या प्रिक्वेलमध्ये दिसणार आहे. त्याच्या चित्रिकरणाला डिसेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. या चित्रपटातून पंजुरली देवतेच्या मुळ कथेचा शोध घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

Latest Maharashtra News Updates live : संभाजीनगर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या परिक्षेत्रात पोलिसांना सापडले ५ कोटी रोख

Gold Price: सोने 6,000 आणि चांदी 12,000 रुपयांनी स्वस्त; ट्रम्प यांच्या विजयानंतर सोनं स्वस्त का होत आहे?

SCROLL FOR NEXT