Rishi Kapoor news  esakal
मनोरंजन

Rishi Kapoor: 'स्वेटरशी' काय होतं खास कनेक्शन? शेवटपर्यत होतं सोबत...

बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्यांची स्वताची अशी हटके स्टाईल आहे. 80 च्या दशकांत मिथुनची वेगळी अदा होती.

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्यांची स्वताची अशी हटके स्टाईल आहे. 80 च्या दशकांत मिथुनची वेगळी अदा होती. त्याच्या हेअर स्टाईलनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. जॅकी श्रॉफची वेगळी स्टाईल होती. अमिताभ (Bollywood Celebrity News) बच्चन यांच्या ड्रेसिंग सेन्सनं चाहत्यांना वेडावून टाकलं होतं. त्यानंतर अनिल कपूर, गोविंदा, कुमार गौरव, अक्षय कुमार आणि (entertainment news) अजय देवगण यासारख्या कलाकारांचं ड्रेसिंग चाहत्यांचे लक्ष वेधून घेत होते. यासगळ्या एका अभिनेत्यानं मात्र त्याचं ड्रेसिंग सेन्स शेवटपर्यत ठेवलं, त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला. कुणाला त्यावेळी वाटलंही नसेल की स्वेटरचीही अनोखी फॅशन होऊ शकते....

प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर यांच्या बहुसंख्य चित्रपटांमध्ये ते स्वेटरमध्ये दिसले आहेत. चांदणी, बोल राधा बोल, दिवाना, प्रेमग्रंथ, त्यांच्या कित्येक चित्रपटांची नावं सांगता येतील ज्यात त्यांनी स्वेटर घातले आहे. सुरुवातीला एखादा अभिनेता अभिनेत्रीसोबत डान्स करताना स्वेटरमध्ये दिसणे हे प्रेक्षकांना थोडं अजब वाटलं होतं. मात्र ऋषीजींनी त्या सेन्सला आयकॉनिक बनवलं. ते त्यांच्या नावावरचं वेगळं रेकॉर्ड झालं. आजही त्यांच्या त्या वेगळ्या स्टाईलचं नेहमी कौतूक होत असतं. ऋषी कपूर यांनी आपल्या शेवटच्या चित्रपटामध्ये देखील स्वेटर परिधान केलं होतं.

आज ऋषी कपूर यांचा जन्मदिवस. 4 सप्टेंबर 1952 मध्ये मुंबईत त्यांचा जन्म झाला. बालकलाकार म्हणून त्यांनी केलेली सुरुवात त्यांना यशाच्या शिखरापर्यत घेऊन गेली. त्यांच्या जन्मदिनानिमित्त काही वेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. ऋषी कपूर हे जसे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जायचे तसे ते त्यांच्या आगळ्या वेगळ्या फॅशनसाठीही प्रसिद्ध होते. चित्रपट कोणता का असेना त्यांच्या अंगावर स्वेटर हे असायचेच...

बऱ्याचदा त्यांच्या चाहत्यांना हा प्रश्न पडायचा की, प्रत्येकवेळी त्यांना स्वेटर परिधान करण्यास कंटाळा कसा येत नाही...ऋषी कपूर यांना वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर्स परिधान करण्याचा शौक होता. त्यांनी आपल्या चित्रपटांत एकदा परिधान केलेले स्वेटर पुन्हा रिपीट केलं नाही. आपली एखादी अनोखी स्टाईल असावी. आणि त्यासाठी आपल्याला ओळखलं जावं असे त्यांना नेहमी वाटत असायचं. एक गोष्ट होती. ऋषीजी यांच्या स्वेटर फॅशनमुळे बाजारात स्वेटरची क्रेझही वाढली होती. त्यांना बॉलीवूडचे स्वेटरमॅन असेही म्हटले जायचे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT