Riva Arora Esakal
मनोरंजन

Riva Arora: 'मी काही १२ वर्षांची लहान मुलगी नव्हे!, मिका अन् करणसोबत रोमान्स वादावर रिवा अरोरा भडकली

सकाळ डिजिटल टीम

रिवा अरोरा ही एक चर्चेत असणारी बालकलाकार आहे. 2019 मधील 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटात गुंजनची भूमिका साकारण्यासाठी आणि 2020 मध्ये 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' मधील अंत्यसंस्काराच्या दृश्यात रडतानाचा तिचा तो सीन अजूनही प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवतो.

ती तिच्या अनेक प्रसिद्ध अभिनयासाठी ओळखली जाते. रिवाही अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय आहे. तिचे लाखो चाहते असून तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

मागील काही दिवसांपासून रिवा चर्चेत आली ती तिच्या वयाने मोठया असणाऱ्या अभिनेत्यासोबत रोमांस करतांनाच्या एका सीनमुळे. त्यानंतर तिच्या वयाबद्दल बोललं गेलं. इतक्या कमी वयात ती इतकी ग्लॅमरस कशी काय झाली आहे. या प्रश्नावर आता रिवाने मोठा खुलासा केला आहे.

गेल्या वर्षी रिवा अरोरा मिका सिंगसोबतच्या डान्स व्हिडिओमध्ये दिसली होती, जे लोकांच्या पसंतीस उतरले नाही. रिवाने तो व्हिडिओ शूट केला तेव्हा ती फक्त 12 वर्षांची होती असं म्हणतं तिच्यावर टिका करण्यात आली. मात्र त्यांनतर तिच्या आईने नंतर प्रतिक्रिया दिली होती. मात्र,आता खुद्द रिवानेच या प्रकरणावर खुलासा केला आहे.

तिने नुकतच सांगितलं की तिला ट्रोलिंगकडे लक्ष द्यायचे नाही आणि त्याऐवजी ती तिचे काम करते. तिला गोष्टींची चांगली बाजू बघायला आवडते, असं सांगत रिवा म्हणाली की, तिला सर्वांकडून भरभरुन प्रेम मिळालेले आहे.

मात्र, पुढे तिला वयाबाबत विचारण्यात आल्यावर तिने, ' ते लवकरच उघड होईल' असं म्हणत तिचे खरे वय सांगण्यास नकार दिला. मात्र त्याचबरोबर तिने असेही सागितले की ती प्रत्यक्षात 12 वर्षांची नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT