Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review Karan Johar  esakal
मनोरंजन

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Review : हँगलेला रॉकी अन् अतिशहाण्या रानीची 'मंद कहाणी'! करण आला माती करुन गेला

सात वर्षानंतर त्यानं पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे. काही अंशी या चित्रपटाच्या माध्यमातून तो यशस्वी झाला आहे.

युगंधर ताजणे

Movie Review : बॉलीवूडमध्ये प्रेमपट कुणी बनवायचे तर ते यश जोहर यांनीच, त्यांच्याशिवाय जर कुणी प्रेमपट बनवले तर ते कसे पांचट आहेत हे प्रेक्षकांच्या मनावर योग्य पद्धतीनं ठसविण्यात बॉलीवूड यशस्वी झाले. त्यामुळे आज बॉलीवूडमधील सर्वोत्तम प्रेमपटांची नावं सांगायची झाल्यास त्यात पहिली तीन ते चार नावं ही यशराज आणि धर्मा प्रॉडक्शनची येतात. अर्थात यात गैर असे काही नाही. पण २०२३ मध्ये देखील आपण कशाप्रकारे प्रेक्षकांना गुंगवून ठेऊ शकतो हे या निर्मात्यांनी दाखवून दिले आहे.

प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा रॉकी और रानी की प्रेम कहानी प्रदर्शित झाला आहे. सात वर्षानंतर त्यानं पुन्हा एकदा दिग्दर्शनाची जबाबदारी स्विकारली आहे. काही अंशी या चित्रपटाच्या माध्यमातून तो यशस्वी झाला आहे. मात्र पुन्हा त्याच प्रकारची लव स्टोरी, दर दहा ते पंधरा मिनिटांनी आदळणारी गाणी, भकास संवाद आणि विस्कळीत कथा यांचा समतोल साधण्यात करण कमी पडला आहे. त्याचा रॉकी और रानी पहिल्यापासून भरकटत जातो.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

तुम्ही जर टीव्ही मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या टिपिकल कौटूंबिक मालिका पाहत असाल किंवा त्या मालिकेचे चाहते असाल तर मग तुम्हाला कऱणचा हा चित्रपट जाम आवडणार याची शंभर टक्के खात्री द्यावी लागेल. पण तुम्हाला त्या रटाळ मालिका पाहून कंटाळा आलाय आणि तुम्ही एक वेगळा प्रयत्न म्हणून जर हा चित्रपट पाहायला जाणार असाल तर तुमची निराशा होणार हे नक्की. त्याचे काय आहे की, करण जोहर अजूनही कभी खुशी कभी गम मधून बाहेर आलेला नाही. हे दिसून येते.

काही वर्षांपूर्वी अर्जून कपूर आणि आलिया भट्टचा टू स्टेट्स नावाचा चित्रपट आला होता. दोघेजण इंजिनिअरींगचे विद्यार्थी एकमेकांच्या प्रेमात पडतात. गोष्ट लग्नापर्यत येते आणि संघर्ष सुरु होतो. दोन्ही कुटूंब वेगळी एक दाक्षिणात्य ब्राम्हण तर दुसरे पंजाबी. कट टू आता आपण रॉकी और प्रेम की कहानीमध्ये येऊ. यात दिल्लीमध्ये मिठाई बनवणारी मोठे हलवाई रंधावाचे मोठे कुटूंब आणि दुसरीकडे बॅनर्जी हे बंगाली कुटूंब. विषय नेहमीचाच - लग्न कसे करायचे?

रंधावा कुटूंबाच्या आपल्या वेगळ्या अटी आणि नियम आहेत. तर बॅनर्जी कुटूंबाच्या लेखी रंधावा कुटूंबाचा लाडका लेक रॉकीला (रणवीर सिंग) कुठलीच शिस्त नाही, त्याचे शिक्षण नाही, त्याची भाषा सडकछाप आहे, त्याला कला, साहित्य, संस्कृती यांची समजही नाही. पण तो एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या अँकरच्या रानीच्या (आलिया भट्ट) प्रेमात पडला आहे. ती देखील खूपच प्रोग्रेसिव्ह आहे. पहिल्यांदा आपण प्रेमात आहोत की हे आकर्षण आहे यात राणीचा गोंधळ होतो. मग नेहमीप्रमाणे दोन- तीन गाणी तुम्हाला आणखी इमोशनल करुन जातात आणि वातावरण फुल्ल टू सॅड होऊन जाते.

रॉकी और रानी की प्रेम कथा हा निव्वळ टीव्हीवरील मालिकांची कॉपी असल्याचा फिल देतो. कभी खूशी कभी गममध्ये जया बच्चन यांची जी सुखी सासूची भूमिका होती इथं ती रागीट आजसासू आहे. धनलक्ष्मी तिचं नाव.ती भलतीच मानी आहे. रंधावा कुटूंबात तिचा दरारा आहे. तिच्या शब्दाला मान आहे. ती म्हणेल तसचं व्हायला हवं नाहीतर कुणाची खैर नाही. तिचा पती (धर्मेंद्र) ज्याचे घरात काही चालत नाही. त्यांच्या शब्दाला मान नाही. हे सगळे का यासाठी करण जोहरची ही मालिका पाहिल्यास त्याचा उलगडा होऊन जाईल.

करण जोहरच्या चित्रपटांचा शेवट हा नेहमीच सुखांत स्वरुपाचा असतो. रॉकी और रानी देखील त्याला अपवाद नाही. इतक्या वर्षांनी करण जोहरनं दिग्दर्शक म्हणून पुढे येण्याची तयारी दर्शवली तर एखादी चांगली कथा तरी शोधायची. यावेळी त्यानं चक्क टीव्ही मालिकांमधील रटाळ कौटूंबिक कथांची कॉपी केली की काय असा प्रश्न पडतो. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षक केवळ रणवीर आणि आलियामुळे पूर्ण पाहतील हे आवर्जून सांगावेसे वाटते. बाकी त्यात विशेष असे काही नाही. या वयात धर्मेंद्र आणि शबाना आझमीचा किसिंग सीन, आलिया रणवीरचे सातत्यानं येणारे किसिंग सीन चाहत्यांना खूश करुन जातील.

कुठल्या काळातले चित्रपट पाहतोय आपण?

रॉकी और रानी की प्रेम कहानी मध्ये एक दृष्य आहे. त्यात सूनबाई रानी ही सासूबाईंना त्यांच्याच कंपनीच्या बोर्ड मिटींगमध्ये एका जाहिरातीवरुन सुनावताना दिसते. काही महिला लाडू बनवत आहेत आणि त्यांचे पती ते खात त्यांचे कौतूक करत आहेत. ही जाहिरात बोर्ड मंडळींना खटकते. अशावेळी ओघानं राणी तिथे येते. तिलाही ती जाहिरात काही आवडलेली नाही. तेव्हा ती सासूबाईंना सांगते की, जग कुठं चाललंय आणि तुम्ही कुठं, आपल्याला बदलायला लागेल.

करण जोहरचा हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यालाही त्याच प्रसंग आणि संवादाची आठवण करुन द्यावी लागेल. प्रेमकथा, कौटूंबिक कथा, कौटूंबिक संघर्ष, वाद हे ठीक आहे. पण त्या नात्यातील भावना काही करुन प्रेक्षकांना आवडावी यासाठी कथेची मोडतोड करण्यात अर्थ नाही. नात्यांमधील संवाद हरवत चालला आहे हे नक्की. त्याला कारणीभूत बदलती जीवनशैली, राहणीमानातील बदल, सगळ्या गोष्टी पैशांशी जोडण्याचा सुरु असलेला प्रयत्न आहे हे सांगावे लागेल.

शेवटी रॉकी आणि रानीची फॅमिली एकत्र येते का, ज्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे ते लग्न होते का, यात कुणाला मोठी किंमत चुकवावी लागते, यासगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला हा चित्रपट पाहिल्यावर मिळेलच. पण आग्रहानं तो पाहावा अशी काही कलाकृती करणनं तयार केलेली नाही. त्याच्या इतर चित्रपटांपैकी हा चित्रपट आहे.

रॉकी और रानी मध्ये रणवीर आणि आलियानं एखाद्या एकांकिकेमध्ये काम केल्यासारखे वाटते. आजकाल युट्यूबवर ज्या मालिका किंवा वेबसीरिज प्रदर्शित होतात त्या कलाकारांची भूमिका थक्क करुन जाते. आपण किती बोल्ड, वेगळ्या अॅटिट्यूटचे आहोत हे दाखविण्याचा आलियाचा प्रयत्न फारच केविलवाणा वाटू लागतो. रणवीरचा उत्साह हा त्याच्या आतापर्यतच्या सगळ्या चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. त्याच्या वाट्याला आलेली भूमिका त्यानं बऱ्यापैकी साकारली आहे.

जूनं ते सोनं असं आपण म्हणतो त्यानुसार या चित्रपटामध्ये जुन्या कलाकारांनीच बाजी मारल्याचे दिसून येते. त्यात खाष्ट सासूबाई जया बच्चन, शबाना आझमी, धर्मेंद्र यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका जास्त मोठ्या नसल्या तरी त्यांनी केलेला अभिनय हा लक्षात राहणारा आहे. हे तीन ही कलावंत बऱ्याच वर्षानंतर एकत्र आले आहे त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्याचा अनुभव घ्यायचा असल्यास तुम्ही रॉकी और रानी की प्रेम कहानी पाहू शकता.

---------------------------------------------------------------------------------------

चित्रपटाचे नाव - रॉकी और रानी की प्रेम कहानी

दिग्दर्शक - करण जोहर

वेळ - २ तास ४५ मिनिटे

संगीत - प्रीतम

छायाचित्रण - मनुष नंदन

रेटिंग - **1.2 (अडीच स्टार)

--------------------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT