Rocky Aur Rani ki Prem Kahani Esakal
मनोरंजन

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: 'हा तर अपमान', 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' देखील वादाच्या भोवऱ्यात

Vaishali Patil

Rocky Aur Rani Ki Prem Kahani: चित्रपट निर्माता करण जोहरचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चा नवा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. तेव्हापासून या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

तर आज या चित्रपटातील 'झुमका' हे नवं गाण रिलिज करण्यात येणार आहे. मात्र चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला त्यावेळी ट्रेलरवरुन थोडा गोंधळ निर्माण झाला होता.

ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यावर बरेच वादविवाद सुरू केले आहेत.

करण जोहर अन् रणबीर सिंगच्या चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका सीनमध्ये नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ट्रेलरमध्ये, जेव्हा रॉकी म्हणजेच रणवीर सिंग राणीच्या आलिया भट्ट घरी 3 महिन्यांसाठी येतो, तेव्हा त्याला रवींद्रनाथ टागोरांचा एक फोटो येतो, ज्यांना तो राणीचे आजोबा आहे का असं म्हणतो.

तो केवळ एक विनोदी सीन दाखवण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला मात्र हे नेटकऱ्यांना मुळीच आवडले नाही. त्यामुळे चित्रपटावर टिका करण्यात येत होती.

मात्र हा वाद अजूनही थांबला नसून नेटकरी सोशल मिडियावर आपल्या प्रतिक्रिया देत तो सीन काढण्याची मागणी करत आहे.

काहींनी करणवर मुद्दाम बंगाली आणि पंजाबी परिवार दाखवल्यामुळे टिका केली आहे तर काहींनी ते भुतकाळातील चुका पुन्हा करत असल्याचं एकानं म्हटलं आहे.

एकानं लिहिलयं की, 'बॉलिवूड भूतकाळातून कधीच शिकणार नाही. रवींद्रनाथ टागोरांची खिल्ली कशी उडवता येईल! त्याच्या उंचीच्या व्यक्तीचा अनादर हे खुप चुकीच आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आल्या प्रमाणे, रणवीर सिंग रॉकी रंधवाच्या भूमिकेत असून धर्मेंद्र आणि जया बच्चन त्याच्या कुटुंबातील सदस्य म्हणून आणि आलिया राणी चॅटर्जी आणि शबाना आझमी तिच्या आजीच्या भूमिका साकारत आहे.

चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम 18 स्टुडिओजद्वारे केली जाते. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. हा चित्रपट यावर्षी 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: महाराष्ट्र विधानसभा निकालांचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? बाजार वाढणार की कोसळणार?

Beed Election Voting: बीडमध्ये उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू; अपक्ष उमेदवाराच्या मृत्यूने हळहळ

Assembly Election Voting 2024: शंभरी पार केलेल्या वृद्धांमध्ये मतदानाचा उत्साह; तुम्ही बजावला का लोकशाहीचा हक्क?

Baramati: राष्ट्रवादी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची; शर्मिला पवार व अजित पवारही पोहोचले मतदान केंद्रावर...

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: ऐरोली विधानसभेत कोपरखैरणे विभागात मोठा राडा

SCROLL FOR NEXT