मुंबई : कोरोना व्हायरसचा त्रास हा सर्व जगवा झाला. काहींना मानसिक, काहींना आरोग्याचा, तर काहींना आर्थिक त्रासही झाला. त्यातच लॉकडाउनमुळे मोठा फटका टीव्ही इंडस्ट्रीला बसला आहे. शूटिंग बंद झाल्याने सर्व कलाकार व पडद्यामागे काम करणारे कर्मचारी घरी बसले आहेत. म्हणूनच डिप्रेशनमध्ये काही कलाकारांनी आत्महत्या केली. अभिनेता रोनित रॉयने एका मुलाखतीत आपल्या स्वतःच्या आयुष्यात आलेल्या अडचणींची व्यथा मांडली.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रोनितने सांगितले, यंदाच्या जानेवारीपासून मी पैसे कमावले नाहीत. मार्च महिन्यापासून एकमेव असलेला माझा व्यवसाय बंद असल्याने त्याचेही उत्पन्न मिळत नाही. म्हणूनच घरातील काही सामान विकून मी जबाबदारी घेतलेल्या 100 कुटुंबांना मदत करीत आहे. मी काही फार श्रीमंत नाही; परंतु समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या हेतूने गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.
रोनित म्हणतो, ""प्रॉडक्शन हाउसेस आणि वाहिन्यांनी गरजूसांठी काहीतरी करायला हवे. केवळ मोठी आणि चमकदार कार्यालय असून, उपयोग नाही. इंडस्ट्रीत 90 दिवसांनी पेमेंट देण्याचा नियम आहे. जेव्हा आम्ही करारावर स्वाक्षरी करतो तेव्हा हे स्पष्टपणे नमूद केलेले असते. मात्र, अशा वेळी जेव्हा प्रत्येकाचे काम थांबलेले आहे. तेव्हा प्रॉडक्शन हाउसने हे समजून घ्यायला हवे. लोकांना दैनंदिन गरजांसाठी पैशांची गरज भासते. त्यांना तुम्ही ऍडव्हान्समध्ये पैसे देऊ शकत नसला, तरी कमीतकमी त्यांच्या कामाचा मोबदला तरी द्यायला हवा. रोनितच्या या रोखठोक वक्तव्याचे अनेक जण कौतूकही करीत आहेत. रोनित भावविवश होऊन म्हणला लॉकडाउनमध्ये काम मिळत नसल्याने काही कलाकारांनी आत्महत्या केल्या; पण आत्महत्या करूनच सर्व काही नीट होईल, असेही नाही.''
स्वतः विषयी बोलताना रोनित म्हणाला, ""1992 मध्ये माझा पहिला चित्रपट रिलीज झाला होता. त्याकाळी 25 आठवडे चालला होता. म्हणजे आताचा 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवणारा चित्रपट समजा; पण नंतरच्या चार वर्षांमध्ये माझ्याकडे पेट्रोलसाठी सुद्धा पैसे नव्हते. मी फक्त घरीच रिकामा बसून होतो.''
काही चित्रपटानंतरही माझ्याकडे जेवणासाठी पण पैसे नसायचे. एवढी भयंकर गरिबीची परिस्थिती होती, तरी मी आत्महत्या केली नाही. मला कोणालाही वैयक्तिक दुखवायचे नाही; पण माझी कळकळीची विनंती आहे, तुम्ही कृपा करून आत्महत्या करू नका. कोणालाही आयुष्यात केव्हातरी आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते, जात असतो. खरतर अशा वेळी आत्महत्या हा काही पर्याय नसतो, असेही रोनित याने नमूद केले.
सुष्मिता सेनच्या नवीन वेब सीरिज आर्याचा टीझर झाला रिलीज; एका वेगळ्या स्टाईलमध्ये दिसली सुश्मिता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.