RRR Oscar Entry esakal
मनोरंजन

RRR Oscar Entry : आतापर्यंत हिंदीच चित्रपटच ऑस्करला कसे गेले? RRR चा एनटीआर भडकला!

भारतातील सर्वात प्रभावशाली दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या एस एस राजामौली यांच्या आरआरआऱ चित्रपटानं आता जगभरामध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

RRR Oscar Entry : भारतातील सर्वात प्रभावशाली दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या एस एस राजामौली यांच्या आरआरआऱ चित्रपटानं आता जगभरामध्ये आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली आहे. त्याच्या नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब मिळाला आहे.

आता आरआऱआऱमधील प्रसिद्घ अभिनेता ज्युनिअर एनटीआर यानं आपल्या चित्रपटाला ऑस्करमधून का नाकारलं असा प्रश्न विचारुन त्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. त्यानं दिलेली प्रतिक्रिया ही चर्चेत आली आहे. यापूर्वी एस एस राजामौली यांनी देखील भारतीय चित्रपट निवड समितीवर सणसणीत प्रतिक्रिया दिली होती.

Also Read - आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

जेव्हापासून आरआरआरला ऑस्कर मिळाला आहे. तेव्हापासून त्याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर आरआरआरचे ऑस्करसाठी ऑफिशयली सिलेक्शन का झाले नाही यावर चर्चा सुरु आहे. आता त्यावर चित्रपटातील कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एनटीआरची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर आरआऱआऱला ऑस्कर मिळणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यावर ज्युनिअर नटराजन म्हणाला की, भारतामध्ये होणारं राजकारण हे काही नवं नाही. आमच्या चित्रपटाचे सिलेक्शन का झाले नाही असा प्रश्नही आम्हालाही पडला होता. गुजराती चित्रपट छेलो शो ला हा मान मिळाला. हरकत नाही. पण कदाचित भाषा महत्वाचा मुद्दा ठरला असेल.

आपण पाहिलं तर बऱ्याच वर्षांपासून भारतीय चित्रपट हे शेवटपर्यत ऑस्करच्या शर्यतीत टिकत नाही. त्यामुळे यासगळ्या गोष्टींचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. तेव्हा आपल्याकडे राजकारणाचा फटका कलाकृतींना देखील बसतो हे दिसून आले आहे. जर आरआऱआऱला ऑफिशियली भारताकडून ऑस्करसाठी घोषित केलं असतं तर आम्हाला नॉमिनेशन मिळाले असते.

मला आणखी काही राजकारणाविषयी बोलता येणार नाही. पण एक गोष्ट नक्की की, आतापर्यत हिंदी चित्रपटांचीच ऑस्करसाठी निवड का गेली, हा प्रश्न यानिमित्तानं समोर आला आहे. असं नटराजननं म्हटलं आहे. हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्यानं कदाचित त्याला प्राधान्य दिले जात असेल असा युक्तिवादही त्यानं व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT