कोरोनामुळे ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मचं महत्त्व थोडं जास्तच वाढलं आहे. आता प्रेक्षक सिनेमागृहात सिनेमा प्रदर्शित झाला तरी तो ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहतात. कारण प्रत्येकाला सिनेमा घरात बसून पाहण्याचा आनंद घ्यायला अधिक आवडतो. एस.एस.राजामौलींचा सुपरहिट 'आरआरआर'(RRR) नं बॉक्सऑफिसवर खूप लांबवर घोडदौड सुरु ठेवली,बक्कळ कमाई केली अगदी जगभरात. जवळ-जवळ ११०० कोटींपेक्षा जास्त कलेक्शन सिनेमानं केलं आहे. ज्युनियर एन.टी.आर आणि रामचरणची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा आता ओटीटी प्रदर्शनासाठी सज्ज आहे. याच्या प्रदर्शनाच्या तारखेची देखील घोषणा झाली आहे.
'आरआरआर' २४ मार्च,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. हिंदी,तेलुगु,तामिळ,मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये पॅन इंडिया धर्तीवर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाला आपण नेटफ्लिक्सवर देखील पाहू शकतो. नेटफ्लिक्सने एक पोस्ट शेअर करीत यासंदर्भातील माहिती दिली आहे. 'आरआरआर' च्या हिंदी व्हर्जनबद्दल अधिक उत्सुकता पहायला मिळत होती. आता आरआरआर हिंदी मध्ये २ जून रोजी प्रदर्शित होणार असल्याची कन्फर्म बातमी आहे. नेटफ्लिक्सनं यासंदर्भातील पोस्ट शेअर करीत कॅप्शन लिहिलं आहे की,''तुम्हाला आवाज ऐकू येत आहे का? आम्ही उत्साहात ओरडत आहोत. 'आरआरआर' हिंदी नेटफ्लिक्सर प्रदर्शित होत आहे,सज्ज रहा''.
'आरआरआर'ला अन्य भाषांमध्ये 20 मे रोजी 'zee 5' वर प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी 'zee 5' ने सांगितले होते की 'आरआरआर' वर्ल्ड डिजिटल प्रीमियर 20 मे रोजी होईल. इंग्रजीसोबतच हा सिनेमा तामिळ,तेलुगु,कन्नड,मल्याळम भाषेत आपण पाहू शकता, असं त्यावेळी म्हटलं गेलं होतं. त्यामुळे हिंदी भाषिक प्रेक्षक नाराज झाल्याचा सूर उमटला होता. पण आता नेटफ्लिक्सनं हिंदी भाषेत RRR प्रदर्शित होणार असल्याची बातमी दिल्यानं प्रेक्षक आता खूश होणार हे नक्की.
'आरआरआर' सिनेमात ज्युनिअर एनटीआर,रामचरण सोबतच आलिया भट्ट,अजय देवगण यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या सिनेमाचं बजेट तब्बल ५५० करोडचं होतं. दोन स्वातंत्र्यसेनानींच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाचं कथानक होतं. ब्रिटिशांविरोधातील लढा या सिनेमात पहायला मिळाला. जगभरात या सिनेमाचं कोडकौतूक झालं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.