naatu naatu song  Sakal
मनोरंजन

Oscar 2023: कष्टाचं चीज! इतक्या महिन्यांत तयार झाले 'नाटू नाटू', युक्रेनच्या राष्ट्रपती भवनात झाले शूटींग...

आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत नाटू नाटू हे गाणे केव्हा आणि कुठे शूट झाले. तसेच हे गाणे किती महिन्यात तयार झाले.

सकाळ डिजिटल टीम

साऊथ सिनेसृष्टीतील ब्लॉकबस्टर चित्रपट RRR मधील नाटू नाटू या सुपरहिट गाण्याने इतिहास रचला आहे. नाटू नाटू ला ऑस्कर मिळाला आणि देशभरातमध्ये चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती.

त्या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याचा बेस्ट ओरिजनल साँग या कॅटगिरीतून नॉमिनेशन देखील मिळाले होते. दरम्यान, आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत नाटू नाटू हे गाणे केव्हा आणि कुठे शूट झाले. तसेच हे गाणे किती महिन्यात तयार झाले.

दक्षिण चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांच्या RRR चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्याच्या शूटिंगबद्दल अनेक माध्यमांच्या मुलाखतींमध्ये उल्लेख केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, राजामौली यांनी एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता की, युक्रेनची राजधानी कीवमधील मॅरिंस्की पॅलेसमध्ये नाटू नाटू गाण्याचे शूटिंग करण्यात आले होते.

नाटू-नाटू या गाण्याचे शूटिंग युक्रेनमधील वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर करण्यात आले आहे. तसेच आरआरआर चित्रपटाच्या इन्स्टाग्राम पेजवरुन देखील युक्रेनमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आले होते.

आरआरआरच्या नाटू नाटू गाण्याचे चित्रीकरण तब्बल १९ महिन्यांत पूर्ण झाले आहे. नाटू नाटू चे संगीतकार एम.एम कीरावानी यांनी आधीच माहिती दिली आहे की 17 जून 2020 रोजी RRR च्या नाटू ना वर काम सुरु झाले होते, जे 19 महिन्यांनंतर पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Exit Poll: एक्झिट पोल येताच देवेंद्र फडणवीस मोहन भागवतांच्या भेटीला; संघ मुख्यालयात खलबतं

Sports Bulletin 20th November : भारतीय क्रिकेटपटूंनी बजावला मतदानाचा हक्क ते लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी पुन्हा भारतात येण्याची शक्यता

Exit Poll: महाराष्ट्राचा महानिकाल! भाजपच राहणार सर्वात मोठा पक्ष, पण सरकार...; एक्झिट पोल्स काय सांगतात? जाणून घ्या

Exit Poll : एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे कुणाला मिळणार जास्त जागा? Chanakya Strategy Exit Poll काय सांगतो?

EXIT POLL: एक्झिट पोल आले! सरकार कुणाचं येणार? महाविकास आघाडी की महायुती?

SCROLL FOR NEXT