RRR Trailor Youtube
मनोरंजन

RRR Trailer: राजामौलींचा मोठा प्रोजेक्ट; डोळ्यांचं पारणं फेडणारा ट्रेलर पहाच!

तब्बल ४५० कोटी रुपये बजेटचा चित्रपट

स्वाती वेमूल

'बाहुबली' या बिग बजेट आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक एस.एस.राजामौली SS Rajamouli यांचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'RRR' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. जवळपास तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा राजामौली यांच्या प्रतिभेचा प्रत्यय येतो. डोळ्यांचं पारणं फेडणारी चित्रपटातील दृश्ये, कलाकारांचं दमदार अभिनय आणि संवाद यांमुळे या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित ही एक भावनिक कथा आहे. ७ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

'RRR' या चित्रपटाचा ट्रेलर ३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणांमुळे तो पुढे ढकलण्यात आलं. अखेर आज (९ डिसेंबर) सकाळी ११ वाजता सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआर कोमाराम भीम यांच्या भूमिकेत आहे तर रामचरण हा अल्लुरी सीताराम राजू यांची भूमिका साकारत आहे.

RRRची निर्मिती DVV दानय्या यांनी त्यांच्या DVV एंटरटेन्मेंट या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत मोठ्या बजेटमध्ये केली आहे. या चित्रपटाचं बजेट ४५० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. RRR हा २०२२ मधील सर्वांत मोठा चित्रपट ठरणार आहे. जगभरातील हजारहून अधिक स्क्रीनवर तो प्रदर्शित होईल. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण यांच्याव्यतिरिक्त चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण, श्रिया सरन, ऑलिव्हिया मॉरिस, रे स्टीव्हन्सन, अॅलिसन डूडी आणि समुथिराकनी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला एमएम किरवाणी यांनी संगीतबद्ध केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT