RRR & The Kashmir Files: अनुराग कश्यप(Anurag Kashayp) हा फक्त बॉलीवूडचा उत्तम दिग्दर्शकच नाही तर त्याला सिनेमांची चांगली पारखही आहे. देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय सिनेमांवरही त्याची चौकस नजर असते. त्यामुळे जेव्हा सिनेमावर तो आपलं मतप्रदर्शन करतो तेव्हा ते एकदम रोखठोक आणि अचूक असतं. आणि अनुराग जेव्हा सिनेमावर बोलतो तेव्हा देशातील लोक ते कान टवकारून ऐकतात.(RRR V/s The kashmir Files which film is more fir for oscars race a detailed analysis) .
आठवडाभर आधीच अनुरागनं एका मुलाखतीत भारतीय सिनेमा आणि त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप याविषयी एकदम सविस्तररित्या भाष्य केलं. यादरम्यान तो म्हणाला,''RRR ला जर ऑस्करसाठी भारताकडून अधिकृतरित्या पाठवण्यात आलं,तर ९९ टक्के त्याला नॉमिनेशन मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे भारताला ऑस्कर जिंकण्याची किमान संधी मिळू शकते''.
याच मुलाखतीत अनुरागने पुढे म्हटलं आहे की,''मला आशा आहे की भारताकडून 'द काश्मिर फाईल्स' पाठवला जाणार नाही''. अर्थात हे वाक्य त्याने खूप सहज म्हटलं. पण कुठल्या गोष्टीवरनं वाद व्हायला किती वेळ लागतो.
'द काश्मिर फाईल्स' या वर्षातला सर्वात अधिक कमाई करणारा बॉलीवूड सिनेमा ठरला आहे. ३०० करोडहून अधिक कमाई करणाऱ्या या सिनेमासोबत अनेक भारतीयांच्या भावना जोडल्या आहेत. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी असलेल्या 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाला लोकांनी अश्रूभरल्या नयनांनी पाहिलं. अर्थात आता विवेक अग्निहोत्रींवर आरोप आहे की हा सिनेमा एक प्रोपेगेंडा सिनेमा आहे आणि कुठल्या तरी राजकीय पुर्वाग्रहातून तो बनवलेला आहे. म्हणून जेव्हा अनुराग कश्यपने या सिनेमाला ऑस्करला भारताकडून पाठवू नये असं म्हटलं तेव्हा हा सिनेमा पाहून भावूक झालेले बरेच लोक भडकले देखील.
तेव्हापासूनच सिनेमाचे एक्सपर्ट ते सर्वसामान्य जनता यांच्यात यावरनं चर्चा रंगली की ऑस्करसाठी भारताकडून कोणत्या सिनेमाला पाठवायला हवं? 'RRR' की 'द काश्मिर फाईल्स', याचं नेमकं उत्तर तर फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच देईल. पण ऑस्करसाठी भारताकडून अधिकृतरित्या जर RRR किंवा द काश्मिर फाईल्सची निवड झाली तर अॅवॉर्ड जिंकायची किती शक्यता असेल,हे चला जाणून घेऊया.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा द काश्मिर फाईल्स बनवण्यामागे काय उद्देश होता, काय राजकारण होतं हे जर बाजूला ठेवलं तर या सिनेमाच्या कथेत प्रेक्षकांना स्वतःमध्ये गुंतवून ठेवण्याची ताकद नक्कीच आहे. पण जर सिनेमा खरंच पाथ-ब्रेकिंग आहे,सिनेमाच्या मर्यादा तोडून बनवला गेलाय असं बोललं गेलं तर मग अशा कितीतरी सिनेमांचा ऑस्कर अॅवॉर्डच्या शर्यतीत असण्याचा आणि तो जिंकण्याचा इतिहास आहे,ज्यांच्यांवर अमेरिकेचा वॉर प्रपोगेंडा प्रमोट करण्याचा आरोप लावला गेला आहे. मग त्यामध्ये अमेरिकन स्नाइपर किंवा जीरो डार्क थर्टी यांची नावं घेता येतील.
ऑस्कर अॅवॉर्ड्सचे परिक्षक अशा कथा पसंत करताना दिसतात ज्यांचे इमोशनल कनेक्शन आहे. काश्मिर मधील पंडितांचे दुःख, स्वतःचेच घर-जमीन सोडून निघून जाणं,आपल्या घरात परत जाण्याची इच्छा,त्यामागची पीडा अशा सगळ्या गाष्टी थेट मनाला स्पर्श करुन जाणाऱ्या आहेत. ही गोष्ट सोडून देऊया की हा मुद्दा भारताच्या एका मोठ्या राजकारणाचा भाग आहे. कारण राजकारण हा मुद्दा इथे तसा महत्त्वाचा ठरत नाही. कारण ऑस्करचे परिक्षक काही दिल्लीत बसत नाहीत.
तसंही आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटलावरही काश्मिरचं महत्त्व आहेच. तसंच काश्मिर फाईल्सला विवध गटांनी विरोध केला हे ऑस्करच्या परिक्षकांच्या लेखी महत्त्वाचे नाही. पण काही गोष्टी मात्र ऑस्करकडून पारखल्या जातात त्या म्हणजे सिनेमाचं कथानक,त्याचं मेकिंग, प्रेझेंटेशन. या अनुशंगाने पाहिलं तर 'द काश्मिर फाईल्स' एका अशा वादांनी घेरलेल्या आणि राजकारणानं बरबटलेल्या विभागाची कथा आहे,ज्याच्यावर बनलेल्या प्रत्येक कालकृतीन आजपर्यंत जगभरातल्या लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जसं अनुराग कश्यप आपल्या मुलाखतीत म्हणाला की एक सिनेमा ज्या ठिकाणावर बनलेला आहे,तो तेथील परंपरा-संस्कृती देखील दाखवतो. त्या अनुशंगाने पाहिलं तर RRR सिनेमात भारतीय परंपरेला-संस्कृतीला खूप छान पद्दतीन दाखवलं आहे. वेगवेगळ्या भाषा, विभाग तिथल्या संस्कृतीमध्ये विभागलेला भारत जो एका माळेत गुंफला गेला आहे,RRR म्हणजे या सगळ्याचं सेलिब्रेशन करणारा सिनेमा. भारतातीलच नाही तर मधनंच इंग्रजी कल्चरलाही ज्या पद्धतीनं सिनेमात दाखवलंय ते देखील वाखाणण्याजोग.
भारताचा स्वातंत्र्य मिळवतानाचा संघर्ष सिनेमात ज्या पद्धतीनं दाखवला आहे ते पाहताना आपण थक्क होऊन जातो हे नक्की. अर्थात याआधी देखील अनेक सिनेमात हा संघर्ष पाहिला असेल पण राजामौली यांचे ग्रॅन्ड व्हिजन कमाल आहे. तर दोन्ही मुख्य व्यक्तिरेखा आदिवासी आणि रेयर रिप्रेझेंटेशन अशा. जे मेनस्ट्रीम सिनेमात फार कमी पहायला मिळतं.
ऑस्कर अॅवॉर्ड्सच्या शर्यतीत सामिल होणारे सिनेमे जगातले सगळ्यात बेस्ट सिनेमे असतात. त्यांची कथा उत्तमच असावी लागते. जगभरातील फिल्म मेकर्स आणि राइटर्स ज्या एका गोष्टीसाठी RRR ची प्रशंसा करतायत ते त्याच्या सिनेमॅटिक ब्रिलियंससाठी. सिनेमाचं एडिटिंग, स्पेशल इफेक्टस्, सिनेमॅटोग्राफी,त्याचे कलर्स,साउन्ड सगळंच उच्च दर्जाचं. साऊंडचं म्हणाल तर ज्यानं सिनेमा पाहिलाय त्याच्या कानात अजूनही कदाचित सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर वाजत असेल.
अनुरागच्या मुलाखतीतलं वक्तव्य आणि द काश्मिर फाईल्सशी जोडल्या गेलेल्या लोकांच्या भावना, यावरनं वाटतंय की भारताला जेव्हा ऑस्करसाठी सिनेमा पाठवायचा असेल तेव्हा RRR आणि द काश्मिर फाईल्स या दोनच सिनेमांची नावं समोर येतील. पण तसं केलं तर ते देखील चुकीचं ठरेल. कारण मग दक्षिणेत पाहिलं तर मलयनकुंजू,हृदयम किंवा केस कोडू किंवा मग मराठीत बनलेला पावनखिंड असे कितीतरी सिनेमे आहेत ज्यांच्यात ऑस्करच्या शर्यतीत सामिल होण्याचा दम आहे. असो, पण सध्यातरी RRR आणि द काश्मिर फाईल्स या दोन सिनेमांची नावं चर्चेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.