Rupali Bhosle News Instagram
मनोरंजन

Rupali Bhosle: वेशभूषा कुठलीही असो रुपाली गळ्यातील 'ती' चेन कधीच काढत नाही; आता जाऊन सांगितलं यामागचं सीक्रेट

एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात रुपालीनं आपल्या या गळ्यातील चेनीमागचं सीक्रेट शेअर करत सगळ्यांना थक्क केलं आहे.

प्रणाली मोरे

Rupali Bhosle News: 'आई कुठे काय करते' मालिकेत संजना ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली भोसले आता महाराष्ट्रातील घराघरात ओळखला जाणारा चेहरा आहे. मालिकेत तिची भूमिका सुरवातीला खलनायकी स्वभावाची असल्यामुळे अनेकांना तिचा राग यायचा.

पण मालिकेतील हीच संजना आता अरुंधतीच्या बाजूनं आणि अनिरुद्धच्या विरोधात उभी राहिलेली दिसल्यानं अनेकांना ती आवडू लागलीय. असो,मालिकेतील अभिनयाचा भाग सोडला तर संजना उर्फ रुपालूीचं ड्रेसिंग स्टाईलही लोकांना आवडतं.

पण यात एक गोष्ट प्रामुख्यानं समोर आली ती म्हणजे कोणताही ड्रेस रुपालीनं परिधान केलेला असला तरी तिच्या गळ्यात एक चैन कायम पहायला मिळते. ढिगभर दागिने घातल्यावरही रुपाली ती काढत नाही आणि ज्या ड्रेसवर गळा रिकामा ठेवायची गरज असते तिथेही हट्टानं रुपाली ही चैन गळ्यात घालते.

आता जाऊन रुपालीनं स्टार प्रवाहच्या पुरस्कारसोहळ्या दरम्यान आपल्या या चेनीमागचं रहस्य प्रसारमाध्यमांसमोर ठेवलं.( Rupali Bhosle aai kuthe kay karte actress reveals why she always wear evil eye chain)

नुकताच स्टार प्रवाह वाहिनीचा 'स्टार प्रवाह पुरस्कार सोहळा २०२३' मोठ्या दणक्यात पार पडला. लवकरच याचं प्रक्षेपण टी.व्हीवर केलं जाईल, यावेळी पुरस्कार सोहळ्यासाठी कॉश्च्युम थीम होती ट्रेडिशनल विथ ट्वीस्ट. यावेळी अनेक कलाकारांनी परिधान केलेल्या वेगवेगळ्या ड्रेसेसनी लक्ष वेधून घेतले.

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेनंही सुंदर ड्रेस घातला होता पण तिच्या गळ्यात नेहमीची इव्हील आय असणारी चेन होती. यामागचं रहस्य तिला विचारताच ती म्हणाली, 'मी ही चेन कायम गळ्यात घालते'.

''जसं संजना मालिकेत अनिरुद्धशी कितीही भांडण करत असली..त्याच्याशी घटस्फोट घेण्याच्या उंबरठ्यावर असली तरी ती गळ्यातलं मंगळसूत्र काढत नाही. तसंच या चेनीशी माझे खास बंध आहेत. मग अगदी कोणतीही वेशभूषा असू दे मी ही चैन काढत नाही''.

''अनेकदा एखाद्या ब्रॅन्डच्या शूटसाठी मला गळ्यातली चेन काढायला सांगतात तेव्हा माझा त्याला स्पष्ट नकार असतो''.

हेही वाचा: कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

रुपाली भोसले पुढे म्हणाली, ''माझा काही गोष्टींच्या बाबतीत हट्टीपणा असतो आणि मी त्यांच्या बाबतीत पझेसिव्ह देखील आहे. त्यापैकी ही चेन एक गोष्ट आहे. मी कोणतीही वेशभुषा करु दे,त्यावर ही चेन भले शोभून दिसत नसेल पण तिला गळ्यातून काढण्याचा माझा हट्ट मी सोडत नाही''.

'' तिच्यात माझ्या भावना गुंतल्या आहेत. ती काढू नये गळ्यातून असं मला वाटतं..म्हणून ती जेव्हापासून घातलीय तेव्हापासून आजतागायत कधीच काढली नाही'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT