Albert Kabo Lepcha bags 'Sa Re Ga Ma Pa' 2023 trophy  Esakal
मनोरंजन

Sa Re Ga Ma Pa 2023 Winner: पश्चिम बंगालचा अल्बर्ट ठरला 'सा रे ग म प 2023' चा विजेता!

प्रसिद्ध रियालिटी शो 'सा रे ग मप 2023' या शोचा ग्रँड फिनाले पार पडला.

Vaishali Patil

Albert Kabo Lepcha bags 'Sa Re Ga Ma Pa' 2023 trophy: लोकप्रिय शो ''सा रे ग म प 2023'' चा रविवारी (26 नोव्हेंबर) महाअंतिम सोहळा दिमाखात पार पडला.

गेली दोन - तीन महिने सा रे ग म प शो झी टीव्हीवर सुरु होता. अखेर या पर्वाला विजेता मिळाला आहे. स्पर्धेचा महाअंतिम सोहळा काल दिमाखात पार पडला. पश्चिम बंगालमधील कलिम्पोंग येथील अल्बर्ट काबो लेप्चा हा या सीझनचा विजेता ठरला.

हिमेश रेशमिया, अनु मलिक आणि नीती मोहन यांनी या शोमध्ये जजची भुमिका उत्तमरित्या पार पाडत स्पर्धकांचे मार्गदर्शन केले.

तर आदित्य नारायणने सुत्रसंचालन करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. रानिता बॅनर्जी, अल्बर्ट लेप्चा, सोनिया गॅम्जर, स्नेहा भट्टाचार्ज आणि निष्ठा शर्मा हे स्पर्धक फिनालेमध्ये पोहचले होते.

सर्वांनी आपला बेस्ट परफॉर्मन्स दिला ज्यात अल्बर्ट लेप्चाने बाजी मारत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर निष्ठा शर्मा फर्स्ट रनर अप आणि रनिता बॅनर्जी सेकंड रनर अप ठरली. सध्या विजेत्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या शोच्या ग्रँड फिनालेला बॉलिवूड अभिनेता गोविंदा, त्याची पत्नी सुनीता आहूजा आणि अभिनेत्री अरुणा इराणी हे फिनालेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सा रे ग मा 2023 जिंकल्यानंतर अल्बर्ट म्हणाला, “माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. खरं सांगायचं तर, स्पर्धा खूपच खडतर होती कारण सीझनचे सर्व स्पर्धक अत्यंत प्रतिभावान होते. मी कृतज्ञ आहे." यासोबतच त्याने सर्व मार्गदर्शकांचे आणि जज यांचे आभार मानले. त्याने आपल्या विजयाचे श्रेय त्याच्या पत्नीला दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी कायम राहणार का? जाणून घ्या आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Jammu Kashmir : ...तर काश्मीरमध्ये वेगळी स्थिती असती; उमर अब्दुल्लांकडून वाजपेयींची तोंडभरून कौतुक, नेमकं काय म्हणाले?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

SCROLL FOR NEXT