Sa Re Ga Ma Pa Tamil lil Champs 3 Winner:  Esakal
मनोरंजन

Sa Re Ga Ma Pa Tamil: कुठे मराठीतले दीड लाख प्राईज मनी अन् तामिळमध्ये दहा लाख! सारेगपमची विनर किल्मिषावर कौतुकाचा वर्षाव

Sa Re Ga Ma Pa Tamil lil Champs 3 Winner: सा रे ग मा प लिल चॅम्प्सचा तामिळ सिझन किल्मिशाने जिंकला आहे.

Vaishali Patil

Sa Re Ga Ma Pa Tamil lil Champs 3 Winner: काही दिवसांपुर्वी सा रे ग मा प लिल चॅम्प्स मराठीचा फिनाले पार पडला. गौरी पगारे ही या शोची विजेती ठरली होती. गौरीने तिच्या गाण्यांनी लोकांना मंत्रमुग्ध केले होते.

हिंदी आणि मराठीप्रमाणेच सारे ग म पा हा रिअॅलिटी सिंगिंग शो तामिळमध्येही खूप लोकप्रिय आहे. यंदा या शोचा 3 सीझन पार पडला.

सा रे ग मा प लिल चॅम्प्सचा तामिळ सिझन किल्मिशाने जिंकला आहे. श्रीलंकेच्या 14 वर्षीय किल्मिशाने या शोची ट्रॉफी आणि प्राईज मनी आपल्या नावे केली.

झी तमिळवर प्रसारित होणाऱ्या सारे ग म प तमिळचा फिनाले काल रात्री नेहरू इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियम, चेन्नई येथे मोठ्या उत्साहात पार पडला. 6 स्पर्धकांनी या शोच्या फिनाले पर्यंत मजल मारली होती.

यात 5 स्पर्धकांचा पराभव करून किल्मिशाने या सीझनची ट्रॉफी जिंकली. किल्मिशाने केवळ ट्रॉफीच नाही तर सोबत 10 लाख रुपयांचे बक्षीसही मिळवले आहे. किल्मिशा विजेती ठरली तर रुथ्रेश कुमार या शोचा फर्स्ट रनर अप ठरला.

श्रीनिवास, अभिराम, विजय प्रकाश, सैंधवी प्रकाश या कलाकारांनी हा शो जज केले. तर अर्चना चांदोखेने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. सध्या सर्वत्र किल्मिशावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

तर दुसरीकडे या शोच्या प्राईज मनीची चर्चा सुरु झाली आहे. एकीकडे मराठी सा रे ग म प लिटिल चॅम्पसची विजेती गौरीला फक्त दिड लाख रुपये मिळाले होते तर तामिळच्या किल्मिशाला दहा लाख रुपये प्राईज मनी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 22 नोव्हेंबर 2024

आजचे राशिभविष्य - 22th नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT