Saba Azad Hrithik Roshan Girlfriend paparazzi : ज्याच्या नावाला बॉलीवूडमध्ये मोठं स्थान आहे. त्याची केवळ भारतातच नाहीतर हॉलीवूडच्या चाहत्यांमध्ये देखील मोठी क्रेझ आहे. आणि ज्याला ग्रीक गॉड ऑफ बॉलीवूड असे म्हणूनही ओळखले जाते त्या ह्रतिकच्या गर्लफ्रेंडवरुन आता वेगळयाच चर्चेला सुरुवात झाली आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)
गेल्या काही दिवसांपासून ह्रतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद ही चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिला सतत सोशल मीडियावरुन केले जाणारे ट्रोल आणि तिचा पापाराझ्झींनी केलेला पाठलाग. यावरुन तिला अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. त्यावर सबानं पहिल्यांदाच आक्रमकपणे तिची भूमिका मांडली आहे. ती काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.
Also Read - Male Andropause: काय सांगता पुरुषांनाही येते रजोनिवृत्ती?
एका मुलाखतीमध्ये सबा म्हणाली की, माझ्या आणि ह्रतिकच्या अफेयरविषयी नेटकऱ्यांना आणि पापाराझ्झींना कळले तेव्हा त्यांनी माझ्या घराबाहेर गर्दी केली होती. ते सतत माझा फोटो घेण्यासाठी उत्सुक असायचे. मला माझी प्रायव्हसी नावाची कोणतीच गोष्ट राहिली नव्हती. सतत सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो आणि त्यामुळे नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जाणे हे नित्याचे झाले होते. माझे त्यांना सांगणे आहे की, मी काय दगडाची बनलेली आहे का, मला त्रास होत नाही का..
पापाराझ्झी कसे वागतात आणि किती मानसिक त्रास देतात याविषयी बोलायलाच नको. कारण त्यांना आपण टाळू शकत नाही. त्यांनाही आपण एखाद्या सेलिब्रेटीला किती त्रास द्यावा त्याचा किती पाठलाग करावा हेही कळत नाही. हा किती घाणेरडापणा आहे हे कुणालाच कसं कळत नाही असा रोखठोक प्रश्न देखील सबानं यावेळी केला आहे. जेव्हापासून मी ह्रतिकची गर्लफ्रेंड आहे त्यांना कळले तेव्हापासून मला खूपच वेगवेगळ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे.
सबानं यासगळ्या प्रकाराबाबत इंडिया टुडेला मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये म्हणते की, तीव्र शब्दांत आगपाखड केली आहे. ती म्हणते, मलाही या इंडस्ट्रीमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मी अनेक गोष्टींची काळजी घेते. पण काही लोकं सामाजिक भान, आपली जबाबदारी याचे भान ठेवत नाही. तेव्हा काळजी वाटते. यासगळ्या प्रकाराची खूपच भीती वाटते. असेही सबानं यावेळी सांगितले.
मी काही खोटं बोलत नाही.पण मला पहिल्यांदा हे ट्रोलिंग खूपच नवीन होतं. त्यामुळे मी त्याचा फारच गांभीर्यानं विचार करत होते. पण आता तेच तेच बोलणे सुरु असल्यानं आणि आपल्याकडे लोकांना बोलण्यास कोणतही कारण पुरेसं असल्यानं त्यांना समजावून सांगण्यात काहीही अर्थ नाही. हे कळून चुकले असेही सबानं म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.