जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या ‘विशेष भागात' सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर हॉट सीटवर येणार आहेत.
दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा पहिला विशेष भाग असणार आहे आणि या भागात सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर यांच्याशी गप्पा रंगणार आहेत.
या बाप-लेकीबरोबर रंगणाऱ्या गप्पा आणि किस्से पाहणे हे प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. याच भागात सचिन पिळगावकर यांनी एक किस्सा सांगितला, तीच आज तुम्हाला सांगणार आहोत.
सचिन यांच्या आयुष्यात अशी एक गोष्ट आहे जी त्यांना कधीच जमली नाही, ज्यावर ते बोलले आहेत.
(sachin and shriya pilgaonkar participate in kon honar crorepati show on sony marathi)
'चित्रपट सृष्टीत तब्बल ६० वर्षे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते सचिन पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. सचिन पिळगांवकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत प्रचंड लोकप्रिय अभिनेते. त्यांनी त्यांच्या अभिनयाचे ठसे त्यांच्या बालपणापासूनच उमटवले आहेत.'
'तसेच श्रिया सुद्धा मराठी सोबतच हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक आघाडीची अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच काही गाजलेल्या वेब मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आजवर आली. श्रियाकडून आपल्या बाबांविषयीचे काही गमतीदार किस्से प्रेक्षकांना पाहायला/ऐकायला मिळणार आहेत.'
या विशेष भागात एक किस्सा सांगताना म्हंटलं की, 'माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी वकिलाची भूमिका कधीच केली नाही. माझी खूप इच्छा होती, अशी भूमिका मला करायला मिळावी पण तशी भूमिका कधी जुळून आली नाही. पण श्रियाने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ही वकिलाच्या भूमिकेपासूनच केली.' अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सचिन पिळगांवकर मंचावर आहेत आणि गाणे सादर होणार नाही, हे शक्य नाही. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर त्यांनी श्रियाबरोबर गाणेही सादर केले आणि 'कोण होणार करोडपती'चा मंच काही काळासाठी संगीतमय झाला. ३ जून रोजी हा भाग हा विशेष भाग पाहायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.