kalam 376 Movie Esakal
मनोरंजन

kalam 376 Movie: 'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला'! सचिन धोत्रेंच्या 'कलम 374' चित्रपटाची घोषणा

Vaishali Patil

Sachin Dhotre's 'Kalam 374' movie announced: आज सर्वत्र दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर अनेक नवनवीन मराठी सिनेमांची घोषणा होत आहे. त्यातच आता दिग्दर्शक सचिन धोत्रे यांनी देखील त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'कलम ३७६' असे या सिनेमाचे नाव आहे.

स्त्रियांवरील अत्याचार या गंभीर मुद्यावर हा सिनेमा भाष्य करणार आहे. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार, त्याचे होणारे शोषण या प्रश्नाचा वेध या चित्रपटात घेण्यात येणार आहे.

कलम ३७६ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले आहे.'ना कोर्ट न खटला, जो चुकला त्याला ठोकला' या चित्रपटाच्या टॅगलाईनने सर्वांचे लक्ष वेधले आहेत.

तसेच या चित्रपटाच्या पोस्टरने देखील सर्वांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टरमध्ये पिस्तुल आणि मागे भिंतीवर सावरकरांचा फोटो, महाराष्ट्र पोलिसची पाटी दिसत आहे. हा एक कोर्टरूम ड्रामा असेल असं चित्रपटाच्या पोस्टरवरून दिसत आहे.

कलम ३७६ या चित्रपटाची निर्मिती आशिष धोत्रे आणि समीर गोंजारी यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन सचिन धोत्रे आणि रवींद्र माठाधिकारी यांनी केले. तर चित्रपटाचे एम. बी.अल्लीकट्टी यांनी या चित्रपटाचे छायांकन केलं आहे. मात्र चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात आहे.

चित्रपटाविषयी दिग्दर्शक संतोष धोत्रे म्हणाले, "लैंगिक गुन्ह्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. गेल्या चार दशकांत इतर गुन्ह्यांच्या तुलनेत बलात्काराचे प्रमाण सर्वाधिक वाढले असून गुन्हेगारांना शिक्षा देण्यात आपण मागे पडत आहोत. दोन वर्षांच्या मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत बलात्काराच्या बळी ठरत आहेत.

अशा स्थितीत कोणतीही कठोर कारवाई करण्याऐवजी आपल्या चुका लपवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारे नेहमीच नवनवीन कारणं शोधत असतात. वृत्तमाध्यमांतून महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगाच्या बातम्या रोज दाखवल्या जातात. ते थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर...?

आजही आपल्या समाजात अत्याचार करणारे खुलेआम फिरतात आणि निष्पाप पीडित मुलीकडे वाईट आणि अपमानास्पद नजरेने पाहिले जाते. समाज किंवा सरकार आपली जबाबदारी नीट पार पाडत नाही. अशा परिस्थितीत मुलीला सुरक्षित वाटेल, ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. याच मुद्द्यांचा वेध चित्रपटात घेतला जाणार आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिला ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन नवे संघ! मिळणार New Champion

Sakal Podcast: विधानसभेसाठी मतदार नोंदणीची मुदत ते विराट कोहलीचा भीमपराक्रम

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 19 ऑक्टोबर 2024

आजचे राशिभविष्य - 19 ऑक्टोबर 2024

Mumbai Local News: पुलाच्या कामासाठी पॉवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळादरम्यानची लोकल वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT