Sachin Goswami Post News: महाराष्ट्राची हास्यजत्राचे लेखक - दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे अनेकदा आजुबाजुला घडत असलेल्या घडामोडींबद्दल त्यांचं मतं मांडत असतात. सचिन गोस्वामींच्या परखड आणि स्पष्ट भुमिकेची सोशल मिडीयावर चर्चा सुरु असते.
गेल्या काही दिवसांमध्ये संभाजी भिडेंच्या वक्तव्यावरुन बराच गदारोळ झाला. त्यावरुन अनेक कलाकारांनी त्यांची मतं व्यक्त केली. अशातच हास्यजत्राचे लेखक - दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी त्याचं मत व्यक्त केलंय.
(sachin goswami from maharashtrachi hasyajatra post viral on social media)
काय आहे सचिन गोस्वामींची पोस्ट?
सचिन गोस्वामींनी फेसबुकवर पोस्ट केलीय.. "समाजात नियोजनबद्धरीतीने विष कालवणे सुरू आहे.. आता ज्याचे खरच देशा वर प्रेम आहे अशा नागरिकांनी समाजातील या विषबाधा झालेल्या आपल्या परिचयातील युवकांना योग्य समुपदेशन करुन , सत्य सांगून,वास्तवाची जाणिव करून दिली पाहिजे..
आपल्या परिसरापुरता जरी प्रयत्न केला तरी समाजातील एकोपा वाढीस मदत होईल.. आता तटस्थता उपयोगाची नाही.. आपापल्या माध्यमांनी समाज निर्विष करू या.. संवेदनशील होऊ या .... माणूस होऊ या..."
सचिन गोस्वामींच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्स
"अंधभक्तांपुढे डोके फोडले तरी काय उपयोग नाही सत्य एक्सेप्ट करायला कोणीच तयार नाही आपले सजेशन चांगले आहेत परंतु ते फक्त आपल्या विचारांची माणसं समजू शकतील."
"आता तटस्थता उपयोगाची नाही . हे खूप महत्वाचं वाक्य आहे . खूप मोठ्या लोकांनी तटस्थता दाखवली गप्प राहिले म्हणून हे सर्व डोक्यावर बसले."
"सर समजावून सांगुन काही उपयोग नाही. ह्यांचे तोंड जेव्हा भाजल्या जाईल तेव्हाच ह्यांची अक्कल ठिकाणावर येईल."
"बोलणारे तुमच्याआमच्यासारखे अल्पसंख्य झालेत.तथाकथित बुध्दिवंत-प्रतिभावंत मौन बाळगून कातडीबचावत आहेत. हेच बेबंदशाहीच्या पथ्यावर पडत आहे सर !"
अशा कमेंट्स करत लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्याला १ लाखांचं बक्षीस
संभाजी भिडेंनी महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन संतापलेल्या समता परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्याने संभाजी भिडे यांची मिशी कापणाऱ्याला बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. समता परिषदेचे माजी जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी भिडेंची मिशी कापणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.
संभाजी भिडे यांनी देशात अशांतता पसरवण्याचं काम सुरु केलं आहे. भिडे हे महापुरुषांबाबत दररोज वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. त्यामुळे भिडेंची मिशी कापणाऱ्याला ओबीसी समाजाकडून वर्गणी करून एक लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा नवनाथ वाघमारे यांनी केली आहे. 'साम टीव्ही'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.