Sai Tamhankar talk about her father death funeral ceremony and her movie shooting incident sakal
मनोरंजन

Sai Tamhankar: मी वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि लगेचच.. हा किस्सा वाचून सईच्या हिमतीला सलाम कराल..

सईनं सांगितली मनाला चटका लावणारी आठवण..

नीलेश अडसूळ

Sai Tamhankar: मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर असतं. ती नेहमीच वेगळेपणासाठी ओळखली जाते. तिनं मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहे.

सई ही अभिनयाबरोबरच सोशल मिडियावरही सक्रिय असते. ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमी काही ना काही पोस्ट करते. सई कायमच चाहत्यांना मोहित केलेलं आहे. पण याच सईनं आपले डोळे पाणावतील असा प्रसंग एका मुलाखतीत सांगितला आहे.

(Sai Tamhankar talk about her father death funeral ceremony and her movie shooting incident)

एका माध्यमाने नुकतीच सईची मुलाखत घेतली. त्यावेळी वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष, नैराश्य हे व्यावसायिक आयुष्यात डोकावतं का? त्यावर परिणाम करतं का? असा प्रश्न सईला विचारण्यात आला. यावर सईने दिलेलं उत्तर पाहून तुमचंही काळीज पिळवटून निघेल.

सई म्हणाली, ''दोन्ही एकमेकांशी संलग्न आहेत. दोन्ही आयुष्य एकमेकांवर परिणाम करतात. काही भूमिका वैयक्तिक आयुष्यात डोकावतात. तर वैयक्तिक आयुष्यातील एखादी घटना तुमच्या कामावर परिणाम करते.''

''याबद्दलचा एक प्रसंग सांगते.... 'हाय काय नाय काय' या सिनेमाचं चित्रीकरण करत होते. त्यावेळी माझ्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून दुसऱ्या दिवशी सेटवर आले. विशेष म्हणजे तो सिनेमा विनोदी धाटणीचा होता. मी एका वेगळ्याच दुःखात असताना विनोदी काम करणं माझ्यासाठी खूप मुश्किल होतं. पण ते मी केलं. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील परिस्थितीत प्रचंड तफावत असते, ती स्वीकारूनच आपल्याला काम करावं लागतं.'' असा धक्कादायक अनुभव सईनं सांगितला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT