Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा आगामी चित्रपट 'इंडिया लॉकडाऊन' चा पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. कोविड-१९ वर आधारित हा चित्रपट मधुर भांडारकरनं दिग्दर्शित केला आहे . (Sai Tamhnakar India Lockdown Movie Poster relaese..netizens comments on sai's look)
सई ताम्हणकरने पेट पुराण, बी.ई,दुनियादारी,क्लासमेट अशा अनेक चित्रपटातून काम करत मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून स्वतःचे नाव केले आहे. रोजगार, मीडियम स्पाइसी सारख्या सिनेमातूनही ती दिसली होती. सई 'सोलो' आणि 'नवरसा' सारख्या अनेक यशस्वी बहु-भाषिक चित्रपटांचा देखील भाग आहे. मिमीमधील तिच्या सहाय्यक भूमिके साठी तिची प्रचंड प्रशंसा केली गेली आहे. ती सध्या तिचा आगामी चित्रपट 'इंडिया लॉकडाउन' च्या रिलीजची तयारी करत आहे, ज्याचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे.
दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या आगामी कोविड-19 वर आधारित चित्रपटात सई महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'इंडिया लॉकडाऊन'मुळे ती 'मधुर भांडारकर यांच्या चित्रपटाची नवी हिरॉईन म्हणून चर्चेत आली आहे. पण याबरोबरच चित्रपटातील तिचा लूक मात्र काही मराठी नेटकऱ्यांना खटकला आहे. त्यांचे म्हणणे आहे बॉलीवूडच्या सिनेमात मराठी कलाकारांना नेहमीच नोकर, भ्रष्टाचारी पोलिस अशाच भूमिकांमधनं दाखवलं जातं. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू आहे. इंडिया लॉकडाऊनमध्येही सईच्या व्यक्तिरेखेला दिलेला लूक काहीसं हेच दर्शवत आहे, असं म्हणत लोकांनी तिच्या लूकवर नाराज होत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहेआणि त्याला कॅप्शन दिले - "The tragedy you know, the untold stories you don't! #IndiaLockdown प्रीमियर २ डिसेंबरला फक्त #ZEE5 वर प्रतिभावान @imbhandarkar!" सोबत.
इंडिया लॉकडाउनमध्ये सई व्यतिरिक्त प्रतीक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, आहाना कुमरा, प्रकाश बेलावाडी आणि इतर कलाकार आहेत. या चित्रपटाचे लेखन अमित जोशी आणि आराधना साह यांनी केले असून पेन स्टुडिओ आणि पीजे मोशन पिक्चर्स यांनी निर्मिती केली आहे. मधुर भांडारकरचा हा चित्रपट २ डिसेंबरला Zee 5 वर प्रदर्शित होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.