माझ्यासाठी तू नेहमीच चॅम्पियन, पत्र पाठवत सिद्धार्थने मागितली सायनाची माफी
दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेवरून भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) हिने चिंता व्यक्त केली होती. यावर अभिनेता सिध्दार्थने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. आता या प्रकरणी सिध्दार्थने (Actor Siddharth) सायना नेहवालची ट्विटरवरून माफी मागितली आहे. सिध्दार्थच्या ट्विटतनंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्यासह क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही तिखट शब्दात समाचार घेतला होता. सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनी सिध्दार्थने माफी मागायला हवी असं म्हंटल होतं.
सायनाने ट्विटरवर लिहिलं होतं की, देशाचे पंतप्रधान सुरक्षित नसतील तर कोणताच देश आपण सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. मोदींच्या सुरक्षेबाबतीत झालेल्या या घटनेचा निषेध करते असे सायना म्हणाली होती.
अभिनेता सिध्दार्थने सायनाच्या ट्विटला रिप्लाय देताना म्हंटल तीच्याबाबत आक्षेपार्ह उल्लेख केला होता. उपरोधिक ट्विट करण्याच्या प्रयत्नात सिध्दार्थने केलेल्या चुकीबद्दल त्याला माफी मागावी लागली.
सिध्दार्थने आपण rude joke केला त्याबाबद माफी मागत आहे असं म्हणत ट्विटरवर माफीनामा शेअर केला. माझे काही बाबतीत तुझ्याशी मतभेद असतील, तसंच तुझे ट्विट वाचताना नाराजी आणि माझ्या मनात राग जरी असला तरी त्यामुळे मी वापरलेल्या शब्दाचे समर्थन करू शकत नाही.
मी केलेल्या उपरोधिक विनोदाबद्दल बोलायचं तर तो काही फार चांगली सुरवात असलेला जोक नव्हता. तो ज्या पद्धतीने पोहोचायला हवा होता तसा पोहोचला नाही असेही सिध्दार्थने म्हंटले. कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तसंच महिला म्हणून तुझ्यावर टीका करायचं म्हणून ते ट्विट नव्हतं. तू नेहमीच माझ्यासाठी चॅम्पियन असशील असे म्हणत सिध्दार्थने माफी मागितली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.