बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार(Dilip Kumar) यांना मृत्यूपश्चात 'भारतरत्न डॉक्टर आंबेडकर' पुरस्कारानं गौरविण्यात आलं आहे. दिवंगत दिलीप कुमार यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे. दिलीप कुमार यांच्या वतीनं 'भारतरत्न डॉक्टर आंबेडकर' पुरस्कार स्विकारताना सायरा बानो यांना अश्रू अनावर झाले होते. हा पुरस्कार स्विकारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला ज्याध्ये स्पष्ट दिसत आहे की दिलीप कुमार यांना गमावल्याच्या दुःखातून त्या अद्यापही बाहेर आलेल्या नाहीत.(Saira Banu Breaks Down Remembering Dilip Kumar)
दिलीप कुमार यांना मिळालेला 'भारतरत्न डॉक्टर आंबेडकर पुरस्कार' सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. या कौतुकाच्या प्रसंगी सायरा बानो यांनी आपले दिवंगत पती दिलीप कुमार यांच्या आठवणी जागवताना एक मोठं वक्तव्य केलं आहे,ज्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'भारतरत्न' पुरस्कारानं सन्मानित करायला हवं अशी मागणी सरकारला केली आहे.
दिलीप कुमार यांना जाहिर झालेला 'भारतरत्न डॉक्टर आंबेडकर' पुरस्कार हा केंद्रिय नेते रामदास आठवले यांच्या हस्ते सायरा बानो यांना प्रदान करण्यात आला. दिलीप कुमार यांचे तेव्हा स्मरण करताना सायरा बानो यांना अश्रू अनावर झाले होते. सायरा यांनी या पुरस्कार सोहळ्यात असं देखील म्हटलं की, ''दिलीप साहेबांचं नाव निघालं की मी माझं रडू आवरु शकत नाही म्हणूनच मी या कारणानं कुठल्या कार्यक्रमात हजेरी लावत नाही. मी खूप भावूक होते''.
पुरस्कार स्विकारल्यानंतर माध्यमांशी बोलताना सायरा बानो म्हणाल्या की,'' मला अजूनही वाटतं कि दिलीप कुमार माझ्याजवळच आहेच आणि सगळं बसून पाहतायत''. सायरा बानो यांनी त्यांना 'भारतरत्न' मिळावा यासंदर्भात बोलताना म्हटलं आहे की,''दिलीप कुमार हिंदुस्थानचे कोहिनूर होते,आणि त्यांना भारतरत्न मिळायला हवा''.
दिलीप कुमार यांचे निधन गेल्या वर्षी ७ जुलै,२०२१ रोजी झालं. ते ९८ वर्षांचे होते. वृद्धापकाळानं आलेल्या शारिरीक समस्यांमुळे त्यांचे निधन झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.