sairat fame actor salya Arbaj Shaikh got Robbed and abused in pune by autorickshaw driver sakal
मनोरंजन

साठ रुपयांसाठी सैराटमधील सल्याला पुणेकर रिक्षाचालकाची शिवीगाळ..

सैराटमधील सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख याने पोस्ट शेयर करून पुण्यातील रिक्षावाल्यांची भंडाफोड केली आहे.

नीलेश अडसूळ

sairat fame salya Arbaj Shaikh : रिक्षावाल्यांवडून होणारा मनस्ताप काही आजचा नाही. कधी भाड्यात लूट तर कधी पातळी सोडून वर्तन. रिक्षा चालकांकडून प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल वारंवार घटना समोर येत असूनही त्यावर प्रशासनाकडून कोणताही तोडगा काढला जात नाही. पुण्यात तर रिक्षाचालकांकडून सर्रास लूट होत असल्याचे अनुभव लोक सांगतात. आता तर चक्क एका अभिनेत्याची लूट झाली आहे. सैराट मधील सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेख याने हा अनुभव घेतला आहे. (pune news)

(sairat fame actor salya Arbaj Shaikh got Robbed and abused in pune by autorickshaw driver)

अरबाज (Arbaj Shaikh) सध्या पुण्यातच राहतो आहे. पुण्याहून गावी निघाला असताना स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी त्याने रिक्षा पकडली. यावेळी त्याला एकदम धक्कादायक अनुभव आला. रिक्षाचालकाने रिक्षा चुकीच्या रस्त्यावरून फिरवत अधिकचे पैसे उकळले शिवाय शिवीगाळ केला. हा धक्कादायक अनुभव त्याने एका पोस्ट मधून व्यक्त केला आहे. शिवाय प्रशासनाकडूनही त्याने मदत मागितली आहे.

अरबाजने लिहिले आहे की, पुण्यात रिक्षावाल्यांकडून लूट.. सगळेच रिक्षावाले असे असतील असे नाही. नांदेड सिटी ते पुणे स्टेशनला यायला 198 रुपये होतात. मी कधीच ओला, उबेर, रॅपिडो सारख्या अॅपचा वापर करत नाही. पाऊस असल्याने मित्राला सोडण्यासाठीदेखील नकार दिला. त्यामुळे मित्राने मला रॅपिडोवरून रिक्षा करून दिली. पाऊस चालू होता. नांदेड सिटीमधून रिक्षा निघाली. त्याने मला खूप फिरवले. मी त्याला म्हटलं दादा तू खूप फिरवतो आहेस. त्यावर त्याने काहीही उत्तर दिलं नाही".

पुढे तो म्हणतो, 'प्रवासादरम्यान 60 रुपये जास्तीचे मागायला त्याने सुरुवात केली. मी का असा प्रश्न उपस्थित केल्यावर त्या रिक्षाचालक मला शिवी देत म्हणाला, पाऊस सुरू आहे. तू इथेच उतर. जास्त बोलू नको. मी रोज रिक्षा चालवतो...तू नाही. तुला 60 रुपये जास्तीचे द्यावे लागतील. नाहीतर इथेच उतर.'

'पाऊस सुरू असल्याने तसेच ट्रेन पकडायची असल्याने अरबाज प्रवासादरम्यान उतरू शकला नाही. पण हा प्रकार थांबावा यासाठी अरबाजने लिहिलं आहे, माझ्यासारख्या रोज पुण्यात राहणाऱ्या माणसाला जर अशा प्रसंगांचा सामना करावा लागत असेल तर गावावरून फिरण्यासाठी जे लोक पुण्यात येत असतील त्यांचे काय हाल होत असतील...त्यांची हे लोक किती लूट करत असतील. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. अपेक्षा करतो की, यंत्रणा यावर मार्ग काढेल'. अशी पोस्ट अरबाज ने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT