Sajid Khan Video 
मनोरंजन

Sajid Khan Video: 'अरे मी अजुन जिवंत'! साजिद खानला का करावा लागला खुलासा?

युगंधर ताजणे

Sajid Khan Video - प्रसिद्ध अभिनेते साजिद खान यांच्या निधनाच्या बातम्या व्हायरल झाल्यानंतर दुसरीकडे बॉलीवूडमधील प्रख्यात निर्माते आणि अभिनेते, दिग्दर्शक साजिद खानची इंस्टा पोस्ट चर्चेत आली आहे. त्याचे कारणही तसेच आहे.

सध्या प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता साजिद खान हा चर्चेत आला आहे. गुरुवारी अशी एक बातमी समोर आली की, साजिक खान यांचे निधन...त्यामुळे नेटकरी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर अनेकांनी साजिद खानच्या घरी फोन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वैतागलेल्या साजिदला अखेर पोस्ट करुन खुलासा करावा लागला.

लोकांना वाटले दिग्दर्शक साजिद खानचं निधन झालं...

दिग्दर्शक साजिद खाननं काही वेळेपूर्वी त्याच्या इंस्टावरुन एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यात त्यानं स्वताचा चादरमध्ये लपटलेला फोटो शेयर केला आहे. तो शेयर करताना त्यानं म्हटलं आहे की, मी अजून जिवंत आहे. मदर इंडिया जो १९५७ मध्ये चित्रपट आला होता. त्यात सुनील दत्त यांची भूमिका करणारा जो लहान मुलगा होता त्याचे नाव होते साजिद खान.

त्याचा जन्म १९५१ मध्ये झाला होता. त्यानंतर माझा जन्म २० वर्षांनी झाला. त्यांचे निधन झाले आहे. देव त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो...मात्र या सगळ्यात काही बेजबाबदार माध्यमांनी ज्या बातम्या दिल्या त्यात माझे निधन झाले असे म्हटले आहे. एवढेच नाहीतर माझा फोटोही दिला होता. त्यामुळे मला मेसेज करणाऱ्यांची संख्याही वाढली. रिप असे मेसेज मला येऊ लागले. मला सगळ्यांना सांगायचे आहे की, मी जिवंत आहे. अजुन मला तुमचे खूप मनोरंजन करायचे आहे.

खरं तर मदर इंडिया चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता साजिद खान यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली होती. ते गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी लढत होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २२ डिसेंबर रोजी त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यांनी माया, द सिगिंग फिलिपिना सारख्या कलाकृतींतून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजित पवारांच्या फेसबुक पेजचे व्हायरल होणारे स्क्रीनशॉट खोटे; राष्ट्रवादी पक्षाकडून खुलासा

काय सांगता! एका गाढवाचा मृत्यू अन् 55 जणांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Updates : वन नेशन वन इलेक्शन म्हणजे निवडणुका संपवण्याचा प्रयत्न - आरजेडी नेते तेजस्वी यादव

Big News : श्रीलंकेचा माजी खेळाडू Dulip Samaraweera वर २० वर्षांची बंदी, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निर्णय

मैत्री, शत्रूंच्या रहस्यांचा उलगडा अन् कमांडो ऑपरेशन्स... जाणून घ्या मौसादच्या महिला एजंट मोहिमांवर कसे काम करतात?

SCROLL FOR NEXT