Salaar Part 1 Ceasefire Prabhas Bollywood Actor Movie  esakal
मनोरंजन

Salaar Movie : 'हॉलीवूड'वाले लावतील डोक्याला हात, 'सालार' च्या निर्मितीची गोष्टच भन्नाट!

बाहुबली चित्रपटानं त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यानंतर प्रभास हा अभिनयाच्या क्षेत्रात वेगळ्या अर्थानं नावारुपाला आला.

युगंधर ताजणे

Salaar Part 1 Ceasefire Prabhas Bollywood Actor Movie : साऊथचा सुपरस्टार प्रभास हा आता देशातील मोठा सेलिब्रेटी आहे. त्याच्या बाहुबली चित्रपटानं त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यानंतर प्रभास हा अभिनयाच्या क्षेत्रात वेगळ्या अर्थानं नावारुपाला आला. गेल्या काही वर्षात प्रभासचे विविध चित्रपट प्रदर्शित झाले. त्याला मिळालेला प्रतिसादही मोठा होता. काही चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले काहींना अपयशाचा सामना करावा लागला.

सध्या प्रभासच्या सालार चित्रपटाची चर्चा आहे. त्यातील त्याचा लूक प्रेक्षकांचा, नेटकऱ्यांच्या कौतुकाचा विषय होता. डिसेंबरमध्ये प्रभासचा सालार प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यातील अॅक्शन सीन आणि प्रभासचा लूक हे सारेच हॉलीवूडच्या धर्तीवर असल्याचे मेकर्सचे म्हणणे आहे. अशावेळी सोशल मीडियावर सालारची मोठी हवा आहे. सालार हा प्रभासचा महत्वकांक्षी प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. Salaar Part 1 Ceasefire Prabhas Bollywood Actor Movie

मोबाईलवरील 'व्हिडिओ अ‍ॅडिक्शन' मुळे ५ वर्षाच्या मुलामध्ये 'ऑटीझम' ची लक्षणे

सालार पार्ट १ सीझफायरचा काही दिवसांपूर्वी टीझर व्हायरल झाला होता. त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षावही केला होता. या चित्रपटाचा प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. खासकरुन त्यातील अॅक्शन सीन ज्याप्रकारे चित्रित करण्यात आले आहे त्यावरुन हा चित्रपट चर्चेचा विषय ठरणार आहे हे नक्की. आपण बऱ्याचदा हॉलीवूडच्या अॅक्शन सीन्स, स्टंटची चर्चा करतो. त्यांच्या चित्रपटातील ते सीन्स आपले लक्ष वेधून घेततात.

Salaar Part 1 Ceasefire Prabhas Bollywood Actor Movie

सालार पार्ट १ मधील ते सीन्स देखील हॉलीवूडच्या चित्रपटांशी बरोबरी करणारे आहेत असे म्हटले जात आहे. प्रशांत नील यांनी सालारचे दिग्दर्शन केले असून त्यांनी हा चित्रपट इंटरनॅशनल लेव्हल स्टाईलमध्ये करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्याची चर्चा अधिक आहे. सालारच्या टीमनं यासाठी पुरेपूर प्रयत्न केला आहे. मेकर्सनं प्रेक्षकांना हा चित्रपट कसा भावेक याकडे लक्ष दिले आहे. याविषयी प्रॉडक्शनमधील एकानं दिलेल्या माहितीनुसार, सालारमधील एक सीन शूट करण्यासाठी ७५० हून अधिक वाहनांचा वापर केला गेला आहे.

ज्यात जीप,टँक्स, ट्रक्स सारख्या वाहनांचा समावेश आहे. ऑन ग्राउंड अॅक्शन सीन मोठ्या प्रमाणावर आहेत. ते परिणामकारक व्हावेत यासाठी विशेष परिश्रम घेण्यात आले आहेत. या चित्रपटाची भव्यता देखील हा चर्चेचा विषय राहिला आहे. प्रशांत नील यांनी यापूर्वी केजीएफ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहे. ज्याची बऱ्याच दिवस चर्चा होती. त्यानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई देखील केली होती.

प्रभासचा सालार पार्ट १ सीजफायर हा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यात प्रभास बरोबरच सुकुमारन, श्रृती हासन, जगपती बाबू यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. हा चित्रपट प्रभासच्या करिअरमधील महत्वाचा चित्रपट ठरणार आहे असे अनेक समीक्षकांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT