Salman Khan and Aayush Sharma 
मनोरंजन

बॉक्स ऑफिसवर सलमान-आयुषच्या 'अंतिम'चा जलवा

'मुळशी पॅटर्न'च्या या हिंदी रिमेकचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं.

स्वाती वेमूल

सलमान खान Salman Khan आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा Aayush Sharma यांच्या मुख्य भूमिका असलेला 'अंतिम : द फायनल ट्रुथ' Antim हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. प्रवीण तरडे दिग्दर्शित 'मुळशी पॅटर्न' या मराठी चित्रपटाचा हा हिंदी रिमेक आहे. महेश मांजरेकर यांनी 'अंतिम'चं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पदार्पणाच्या दिवशी जवळपास ४.२५ ते ४.०५ कोटी रुपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला आहे. वीकेंडला कमाईत आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अंतिम हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. तर जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला 'सत्यमेव जयते २' हा त्याच्या एक दिवस आधी २५ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. जॉनच्या चित्रपटाला मात्र अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नाहीये. 'बॉक्स ऑफिस इंडिया' या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अंतिमने ४.२५ ते साडेचार कोटी रुपयांची कमाई केली. वीकेंडला हा आकडा आणखी वाढू शकतो. 'अंतिम'च्या प्रदर्शनाचा परिणाम 'सत्यमेव जयते २'च्या कमाईवर झाला आहे. मल्टिप्लेक्समध्ये 'सत्यमेव जयते २'च्या कमाईत ४० ते ५० टक्क्यांची घट झाली आहे.

चित्रपटात आयुष हा राहुलिया ही भूमिका साकारत आहे. चित्रपटातील क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी जवळपास पाच ते सहा तास लागले आणि या वेळेत आयुषला तब्बल ३३ किलोमीटर धावावं लागलं. पुण्यात हा सीन चित्रित करण्यात आला. चित्रपटातील भूमिकेविषयी आयुष म्हणाला, "मला या भूमिकेसाठी शारीरिक मेहनत खूप घ्यावी लागली. कारण मला ऑनस्क्रीन फिट दिसायचं होतं. या भूमिकेने मला खूप काही दिलं. एक अभिनेता म्हणून यातून मी खूप काही शिकलो. महेश सर, सलमान भाई यांनी माझी खूप मदत केली." चित्रपटाची निर्मिती सलमाननेच केली आहे. त्याचप्रमाणे यात तेलुगू अभिनेत्री प्रज्ञा जैस्वाल, सयाची शिंदे, महिमा मकवाना हे कलाकारदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : दक्षिण नागपूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे मोहन मते 15573 मतांनी विजयी

Harish Pimple Won Murtizapur Assembly Election 2024: भाजप उमेदवार हरीश पिंपळे तिसऱ्यांदा विजयी!

Chiplun Assembly Election 2024 Results : चिपळूण विधानसभा निवडणुकीत शेखर निकमांनी राखला गड; प्रशांत यादवांचा पराभव

Purandar Assembly Election 2024 Result Live: तिरंगी लढतीत विजय शिवतारेंनी पुरंदरचा 'गड' राखला, संजय जगताप यांना धोबीपछाड

Sajid Khan Pathan won Akola West Election 2024: भाजपचा बालेकिल्ला काँग्रसने जिंकला! अकोला पश्चिममध्ये साजिद खान पठाण करणार 'राज्य'

SCROLL FOR NEXT