salman khan bajrangi bhaijaan movie  
मनोरंजन

Salman Khan : सलमानच्या 'बजरंगी भाईजान'च्या सह निर्मात्यावर संकट, बंगळुरुमधील मॉलला लावले टाळे! काय आहे कारण?

सलमानच्या बजरंगी भाईजानच्या (Salman khan news) चित्रपटात सह निर्माता म्हणून त्यानं महत्वाची भूमिका पार पाडली होती.

युगंधर ताजणे

Salman Khan Producer Vyankatesh News: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या वेगळ्या स्टाईल अन् स्वॅगसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. त्याच्या (salman khan news) व्हिडिओची नेहमीच चर्चा होते.गेल्या वर्षी भाईजानचा टायगर 3 ने (Tiger 3) प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले होते. या चित्रपटानं बॉक्सऑफिसवर प्रचंड कमाई केली होती.

या सगळ्यात सलमानच्या बजरंगी भाईजानची चर्चा पुन्हा एकदा होत (Salman Khan Latest News) आहे. याचे कारण बजरंगी भाईजानचा सह (Bajrangi Bhaijaan Producer) निर्माता रॉकलिन व्यंकटेशच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून आलेआहे. त्याच्या बंगळुरुमधील मॉलला सील करण्यात आले आहे. मॉलवर जो काही (Latest Entertainment News) कर होता तो न चुकता केल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

बंगळुरुच्या अधिकाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्या व्यक्तीनं टॅक्स पे न केल्यानं त्याच्या रॉकलाईन मॉलवर कारवाई करण्यात आली आहे. त्या मॉलची मुळ (Vyankatesh ) मालकी निर्माता व्यंकटेश याच्याकडे आहे. ज्यानं २०१५ मध्ये सलमान सोबत बजरंगी भाईजान नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती.

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, व्यंकटेशला अनेकदा नोटीस पाठवून देखील त्यानं कर भरलेला नाही. त्यामुळे अखेर संबंधित अधिकाऱ्यांना ही कारवाई करावी लागली आहे. असं म्हटलं जात आहे की, त्या मॉलवर २०११ ते २०२३ पर्यत तब्बल ११.५१ कोटींचा कर पेडिंग आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Jitendra Awhad: चौथ्यांदा निवडून येवूनही आव्हाडांचे कार्यकर्ते नाराज; जाणून घ्या काय आहे कारण

EVM पडताळणीच्या मागणीचा अधिकार ‘या’ 2 पराभूत उमेदवारांनाच! प्रत्येक ‘ईव्हीएम’च्या पडताळणीसाठी भरावे लागतात 40 हजार रुपये अन्‌ 18 टक्के जीएसटी, मुदत 7 दिवसांचीच

Panchang 27 November: आजच्या दिवशी विष्णुंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT