Being Human Tiger 3 actor Salman Khan big step esakal
मनोरंजन

Salman Khan : सलमाननं कर्नाटक अन् राजस्थानमधील शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय, तब्बल २५ हजार शेतकऱ्यांना आता...

. आता सलमानच्या या संस्थेनं कापसाचे उत्पादन घेणाऱ्या २५ हजार शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

युगंधर ताजणे

Being Human Tiger 3 actor Salman Khan big step : बॉलीवूडचा भाईजान म्हणून सलमान खान ओळखला जातो. त्याचा केवळ भारतातच नाहीतर जगातील विविध देशांमध्ये चाहतावर्ग आहे. सलमान हा त्याच्या हटके स्टाईल आणि स्वॅगसाठी ओळखला गेलेला अभिनेता आहे. आता सलमान एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला आहे.

सलमान हा जसा त्याच्या आक्रमक आणि तापट स्वभावासाठी प्रसिद्ध आहे तसाच तो त्याच्या दानशूरपणासाठीही ओळखला जातो. त्यानं त्याच्या बिइंग ह्युमन या संस्थेमार्फत कित्येक संस्थांसाठी काम केले आहे. त्यातून त्यानं मनाचा मोठेपणा दाखवत मोठमोठ्या प्रमाणात दानधर्मही केल्याचे सांगितले जाते. आता तो शेतकऱ्यांसाठी धावून आला आहे. त्याच्या संस्थेसाठी जे काही केले त्याची चर्चा होताना दिसत आहे.

‘१० ते १२ तास रिक्षा चालवून ५०० रुपये देखील सुटत नाही..'

बिईंग ह्युमन नावाची संस्था ही गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि आरोग्याची जबाबदारी घेते. याच नावानं एक मोठा कपड्याचा ब्रँड देखील आहे. आता सलमानच्या या संस्थेनं कापसाचे उत्पादन घेणाऱ्या २५ हजार शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. अमर उजालानं याविषयी अधिक माहिती दिली आहे. मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सलमानची बहिण आणि बिईंग ह्युमन क्लॉथिंगची मुख्य अलवीरा खान हिनं फेयर ट्रेड सोबत एक करार केल आहे.

या निर्णयाचा फायदा कर्नाटक आणि राजस्थानमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहे.

फेयर ट्रेड ही एक आंतरराष्ट्रीय संस्था असून जी शेतकऱ्यांशी जोडली गेली आहे. याबाबत अधिक माहिती देताना अलवीरा म्हणाली की, आपले कपडे हे कापसापासून तयार होतात. आम्ही घेतलेल्या या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे याचा आनंद आहे. त्यातून त्यांची आर्थिक स्थिती आणखी सक्षम होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''एकनाथ शिंदेंना नाराज करता येणार नाही'' दिल्लीतल्या नेत्यांची भूमिका? अमित शाह उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर? 'सीएम'ची घोषणा होण्याची शक्यता

RCB Squad IPL 2025: काहे दिया परदेस! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं 'विदेशी' प्रेम; भुवनेश्वर, कृणाल पांड्याची निवड ठरणार मास्टरस्ट्रोक

Ajit Pawar: अजित पवार विनासुरक्षा 'देवगिरी'तून बाहेर पडले; मुख्यमंत्री पदावरुन घडामोडींना वेग

IPL Mega Auction 2025: ३० लाख ते ३.८० कोटी! युवीच्या 6 Ball 6 Six विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या Priyansh Arya साठी तगडी चुरस

महाराष्ट्राचं स्टेअरिंग दिल्लीच्याच हातात! बिहार पॅटर्नवर फुली? मुख्यमंत्रीपदाबाबत पडद्याआड नेमकं घडतयं तरी काय?

SCROLL FOR NEXT