salman khan bodyguard shera mother filed fir against society members for using abusive language SAKAL
मनोरंजन

Salman Bodyguard Shera: सलमानचा बॉडीगार्ड शेराच्या आईसोबत असभ्य वर्तन, पोलिसात FIR दाखल

Devendra Jadhav

Salman Khan News: अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेराच्या आईला सोसायटीतील काही सदस्यांनी शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आलीय. यासंदर्भात शेराने त्याच्या सोसायटीतील एका सदस्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

शेराने आईच्या वतीने मुंबईतील अंधेरी येथील मनीष नगर येथील इमारतीच्या सचिवाविरुद्ध डीएन नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. शेराची आई प्रीतम कौर जॉली यांनी आरोप केला आहे की, सोसायटीचे सदस्य जयंती लाल पटेल तिची बदनामी करत आहेत आणि असभ्य भाषा वापरत आहेत.

(salman khan bodyguard shera mother filed fir against society members for using abusive language)

FIR कॉपीमध्ये असं नमूद करण्यात आलंय की, प्रीतम कौर (शेराची आई) यांच्या निवेदनानुसार जयंतीलाल पटेल यांनी तिची प्रतिमा डागाळण्यासाठी अपमानास्पद भाषा वापरली. याशिवाय ही घटना त्यांच्या पतीच्या उपस्थितीत सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घडली.

पटेल यांनी शेराच्या आईला उद्देशून असभ्य टिप्पणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जयंतीलाल यांनी प्रीतम कौरला सांगितले की, 'तु स्वतःला कोण समजते? आता एजीएममध्ये बघ (वार्षिक सोसायटी बैठक), मी तुला सगळ्यांसमोर कसं उघडं पाडतो.' जयंतीलाल सोसायटी सदस्यांना सांगत आहेत की शेराच्या आईने सोसायटीच्या विरोधात सोसायटी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये अन्यायकारक तक्रार केली आहे.

E Times शी बोलताना शेरा यांनी याबाबत सांगितले की, 'आम्ही गेल्या 50 वर्षांपासून आशिष को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये राहत आहोत. काही वर्षांपूर्वी मी ओशिवरा येथे राहायला गेलो. माझे आई वडील माझ्या मुलासोबत आमच्या जुन्या घरी राहत होते. मम्मी सोसायटीचे अध्यक्ष तर जयंतीलाल सचिव होते. इमारतीच्या नूतनीकरणाचे काम 2016 मध्ये सुरू झाले आणि जयंतीलाल म्हणाले की ते 60 लाख रुपयांमध्ये पूर्ण होईल. सचिव हे काम पूर्ण करू शकले नाहीत आणि त्यानंतर माझ्या आईने 2021 मध्ये तिच्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर सेक्रेटरीने माझ्या आईविरुद्ध नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली, त्यांनी सोसायटीतील इतर १३ सदस्यांसह माझ्या आईविरुद्ध रजिस्ट्रार कार्यालयात तक्रार दाखल केली. सेक्रेटरी माझ्या आईकडे बोट दाखवू लागली. मला वाटलं की हे प्रकरण मिटेल पण प्रकरण चिघळतच गेलं.

शेरा शेवटी म्हणाला, 'जयंती लालने सोसायटीतील इतर सदस्यांसमोर माझ्या आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली (ज्यांनी माझ्या आईसह तक्रारीवर स्वाक्षरी केली होती). माझे आई-वडील मिटींगमध्ये सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांनी माझ्या आईला शिवीगाळ आणि धमक्या देण्यास सुरुवात केली. महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याशी असे कसे करू शकता? माझी आई म्हणाली की आपण तक्रार नोंदवू, म्हणून आम्ही पुढे जाऊन डीएन नगर पोलीस ठाण्यात कलम ५०९ आणि ५०० अंतर्गत तक्रार दाखल केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates: छ्त्रपती संभाजीनगर येथून ८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना - पालकमंत्री अब्दुल सत्तार

रोहित, मैं आपसे बोहोत प्यार करती हूँ! मुलीच्या प्रपोजनंतर Rohit Sharma लाजला पण, पत्नी रितिका... Video Viral

गोफण | सुखाची झोप उडाली, वस्तादांचा मोठा गेम

'स्त्री 2' मधील कोरिओग्राफरचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार रद्द, लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे आयबी मंत्रालयाचा निर्णय

Body Wash: जर तुम्ही बॉडी वॉश वापरतायं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

SCROLL FOR NEXT