Duplicate Salman Khan Arrested: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान यांची फॅन फॉलोइंग मोठी आहे. त्याला मानणारा प्रेक्षकवर्गही कोटीत आहे.अशावेळी त्याचा जेव्हा एखादा चित्रपट (Salman Khan) प्रदर्शित होतो तेव्हा त्याला मिळणारा प्रतिसादही तसाच जबरदस्त असतो. (Bollywood News) सलमान हा अनेकदा त्याच्या वादग्रस्त स्वभावामुळे चर्चेत येत असतो. आपल्या आक्रमक आणि रागीट स्वभावासाठी सलमान ओळखला जातो. त्यामुळे त्याला (Bollywood Actors) अनेकदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे. केवळ सलमानच नाहीतर त्याचे डुप्लिकेटही लोकांना त्रस्त करत असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी अशाच एका तोतया सलमानला अटक केली आहे. तो अर्धनग्न होत रस्त्यावरील लोकांना विनाकारण त्रस्त करत असल्याचे दिसून आले होते. त्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याचे नाव आजम अक्सर असे असून तो सलमानचा डुप्लिकेट म्हणून प्रसिद्ध आहे.
आजम हा नेहमीच सोशल मीडियावर रिल्स बनवून नेटकऱ्यांच्या चर्चेत असतो. सोशल मीडियावर तो सलमान म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तो सलमान सारखी बॉडी तयार करुन, त्याच्या सारखा गेट अप करुन त्यानं रस्त्यावर बराच काळ वाहतूक कोंडी केली होती. त्यामुळे वैतागलेल्या लोकांनी पोलिसांकडे अन्सारी विरोधात तक्रार केली. आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. यापूर्वी देखील त्यानं आपल्या दबंगगिरीनं लोकांना वैताग आणल्याचे दिसुन आले होते. सोशल मीडियावर डुप्लिकेट सलमान खान म्हणून लोकप्रिय झालेल्या अन्सारीला पोलिसांनी अनेकदा त्याच्या वागणूकीवरुन ताकीदही दिली होती. त्याला अटक करण्यात आल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे.
लखनौ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. जेव्हा ही बातमी व्हायरल झाली तेव्हा लोकांना असं वाटलं की, खरोखरच्या सलमान खानलाच अटक करण्यात आली आहे. आजमवर पोलिसांनी कलम 151 सहीत गुन्हा दाखला करण्यात आला आहे. सलमान खानची वेशभूषा करुन तो लोकांना मनोरंजनाच्या नावाखाली त्रास द्यायला सुरुवात करतो. आताही त्यानं असाच एक प्रकार केला. सर्वसामान्य लोकांसाठी मोठी वैतागवाडी ठरली आहे. त्याच्या बेशिस्तपणाचा फटका लोकांना सहन करावा लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.