Salman Khan gave a surprise to cancer sufferer Jaganbir, video went viral  SAKAL
मनोरंजन

Salman Khan: शब्द पाळला! कॅन्सरग्रस्त जगनबीरला भाईजाननं दिलं सरप्राईज, व्हिडीओ व्हायरल

सलमान खानने छोट्या जगनबीरला दिलेला शब्द पाळला आहे

Devendra Jadhav

Salman Khan News: सलमान खान हा बॉलिवूडचा भाईजान. सलमान बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेच शिवाय आपल्या फॅन्सच्या इच्छा पूर्ण करण्यात सुद्धा अग्रेसर आहे.

अशातच सलमान खानचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत ९ वर्षांच्या कॅन्सरग्रस्त मुलाला भेटण्यासाठी भाईजान पुढे आला. आणि त्याने सरप्राईज दिलं.

(Salman Khan gave a surprise to cancer sufferer Jaganbir, video went viral )

9 वर्षांचा छोटा जगनबीर सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे. तो दीर्घकाळ कॅन्सरशी लढत होता. त्याने अलीकडेच कॅन्सरवर मात केली. सलमान खानने या मुलाला भेटण्याचा शब्द दिला होता. तो त्याने पाळला आहे. त्यामुळे भाईजानवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

९ वर्षीय जगनबीरने केमोथेरपीच्या ९ राऊंडनंतर कॅन्सरवर मात केली आहे. 2018 मध्ये, सलमान खान पहिल्यांदा जगनबीरला मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भेटला. जिथे 4 वर्षांच्या जगनबीरवर ट्यूमरसाठी केमोथेरपी सुरू होती. कर्करोगाविरुद्धची लढाई जिंकल्यावर तो त्याला भेटेल, असे वचन त्याने मुलाला दिले होते.

गेल्या वर्षी जगनबीरने कॅन्सरवर मात केल्यानंतर, डिसेंबर 2023 मध्ये सलमानने त्याची वांद्रे येथील घरी भेट घेतली. छोट्या जगनबीरला उपचारांच्या वाईट काळात दिलेलं वचन त्याने पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT