Salman Khan, Hrithik Roshan, Tiger Shroff, and 3 Cricket Stars Legal get notice for endorsing tobacco brand from lawyer  Esakal
मनोरंजन

Salman Khan-Hrithik roshan Legal Notice: सलमान -हृतिक आणि 'या' माजी क्रिकेटपटूंसह 6 जणांना कायदेशीर नोटीस! नेमकं प्रकरण काय?

जाहिरात केल्याबद्दल हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि सलमान खान हे कलाकार अडचणीत आले आहे.

Vaishali Patil

Salman Khan-Hrithik roshan Legal Notice: सध्या कलाकारांना पान मसाल्याच्या जाहिरात करणे चांगलेच महागात पडत आहे. काही दिवसांपुर्वी अक्षय कुमारही अशाच एका अडचणीत सापडला होता.

तर आता गुटखा कंपनीची जाहिरात केल्याबद्दल हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि सलमान खान हे कलाकार देखील अडचणीत आले आहे. या कलाकारांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

हे कलाकारच नव्हे तर माजी क्रिकेटपटू कपिल देव, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांनाही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

हे कलाकार आणि क्रिकेटर्स गुटखा कंपनीची जाहिरात करतात. या संदर्भात लखनौ उच्च न्यायालयाचे वकील मोतीलाल यादव यांनी या सर्व 6 जणांना कायदेशीर नोटीस पाठवल्याचे वृत्त आहे.

2023 मध्ये पान मसालाची जाहिरात चांगलीच चर्चेत आली होती. पान मसाला जाहिरातीबाबत अक्षय कुमारला तर थेट चाहत्यांची माफीही मागावी लागली.

यानंतर अक्षय कुमार, अजय देवगण आणि शाहरुख खान यांना पान मसाला जाहिरातीसाठी नोटीस पाठवल्यानंतर आता सलमान - हृतिकया कलाकारांसह माजी क्रिकेटपटू देखील अडचणीत आले आहेत.

इतकंच नाही तर आता पान मसाला जाहिरातीसाठी कलाकारांनी केलेला करार 15 दिवसांत संपवावा, अशी सुचना देण्यात त्यांना आली आहे. तसे न केल्यास गुटखा कंपनीचे समर्थन केल्याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात या स्टार्सची नावेही जोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जर त्यांनी तसे केले नाही, तर या लोकांची नावे न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात समाविष्ट केली जातील किंवा या सर्वांविरुद्ध नवीन जनहित याचिका दाखल केली जाईल.

याप्रकरणी स्टार्सशिवाय काही क्रिकेटपटूंनाही कायदेशीर नोटीस मिळाली आहे. ज्यात कपिल देव, सुनील गावस्कर आणि वीरेंद्र सेहवाग यांसारख्या माजी क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे.

त्यामुळे आता या बातमीमुळे या कलाकारांच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. आता या प्रकरणी कलाकार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर दुसरीकडे शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांना अलाहाबाद कोर्टाने नुकतीच नोटीस पाठवली होती. त्यावर केंद्र सरकारच्या वकिलाने लखनौ खंडपीठाला ही याचिका फेटाळण्यास सांगितले होते. या प्रकरणाची सुनावणी पुढील वर्षी 9 मे 2024 रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: मेळघाटातील सहा गावांचा निवडणुकीवर बहिष्कार

Assembly Elections Voting Percentage: सर्वाधिक गडचिरोलीमध्ये तर सर्वात कमी नांदेडमध्ये; सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात एकूण किती टक्के मतदान?

IND vs AUS: भारतीय संघात ऐनवेळी बदल, युवा फलंदाजाचा तातडीने केला समावेश; BCCI ने का घेतला असा निर्णय?

ST Bus Service : निवडणुकीचा एसटी सेवेला फटका! लालपरीच्या तब्बल ८८४ फेऱ्या रद्द, प्रवाशांची गैरसोय

IPO Rule: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; पुढील महिन्यापासून बदलणार IPOचे नियम?

SCROLL FOR NEXT