Sam Bahadur song Banda OUT : प्रसिद्ध दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादुर हा आता प्रचंड चर्चेत आला आहे. भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्यावर आधारित बायोपिकची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील पहिलं गाणं 'रब का बंदा है ये' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून त्याची जोरदार चर्चा आहे.
ज्यावेळी त्या चित्रपटातील विकी कौशलचा माणेकशा यांच्या वेषातील लूक समोर आला होता तेव्हा त्याचे प्रचंड कौतुक झाले होते. नेटकरी, चाहते यांनी त्याचे अमाप कौतुकही केले होते. बंदा गाण्यावर आलेल्या नेटकऱ्यांच्या कमेंट्सही भन्नाट आहेत. ते गाणं प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायलं आहे. त्यातील विकीच्या अभिनयावर चाहते फिदा झाले आहेत.
Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका
विकी कौशल, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा यांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी सोशल मीडियावर सॅम बहादुरचा ट्रेलरही समोर आला होता. त्यालाही चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. बढते चलो नंतर जिंदा बंदा हे ये गाण्याची चर्चा आहे.
विकी कौशलचा सॅम बहादूर हा १ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याचवेळी रणबीर कपूरचा बहुचर्चित असा अॅनिमल देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रणबीरचा ब्रम्हास्त्रनंतर मोठा चित्रपट म्हणून अॅनिमलकडे पाहिले जाते. सॅम बहादूरमध्ये सान्या मल्होत्रानं सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा सना शेखनं इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सॅम बहादुर या चित्रपटाविषयी आणखी सांगायचे झाल्यास त्यात प्रसिद्ध अभिनेता नीरज काबी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची भूमिका साकारली आहे. तर एडवर्ड सोनेब्लिक यांनी लॉर्ड माऊंटबॅटन यांची भूमिका साकारली आहे. याशिवाय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत गोविंद नामदेव आणि मोहम्मद झिशान अयुब हा यहाया खान यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.