Vicky Kaushal Sam Bahadur Movie: बॉलिवूडमधील सर्वात प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक असलेल्या विकी कौशल त्याच्या सॅम बहादूर या सिनेमामुळे चर्चेत होता. विकी कौशल स्टारर सॅम बहादूर हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती.
या चित्रपटातून विकीने पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचे उत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूर या चित्रपटातील विक्की कौशलच्या अभिनयाची नेटिझन्स प्रशंसा करत आहेत. सॅम बहादूर चित्रपट प्रेक्षकांना कसा वाटला याबाबत ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सॅम बहादूर चित्रपटाबद्दल एकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले - 'अमेझिंग विकी कौशल. हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट असणार आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांना अतिशय उत्तमप्रकारे दाखविले आहे. विकी तू प्रत्येक पात्र साकारत नाहीस तर ते जगतो..'
तर दुसऱ्याने लिहिले, 'उत्कृष्ट! विकी कौशलचा हा एक मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट असणार आहे, आर्मी ऑफिसरची भूमिका तू जगली आहेस विकी.'
दुसर्याने चित्रपटाला पाच पैकी चार स्टार देत लिहिले की, 'निर्भय - धैर्यवान विकी कौशल आणि मेघना गुलजार यांचा बहुप्रतिक्षित सॅम बहादूर हा एक अप्रतिम चित्रपट आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एका खऱ्या भारतीयाला आपल्या सैन्याचा आणि अनेक हिरोंचा अभिमान वाटेल . सॅम माणेकशॉ हे इतके मोठे दिग्गज होते, मला वाईट वाटते की सॅम बहादूरवर चित्रपट बनवायला जवळपास 50 वर्षे लागली. अवश्य पहा'
'बोल्ड - साहसी - ऑन द पॉइंट विकी कौशल आणि मेघना गुलजार यांचा सॅम बहादूर हा एक जबरदस्त चित्रपट आहे, जो आपल्या भारतीय सैन्याचा आणि अनेक हिरोंचा खरा भारतीय अभिमान वाटावा अशा क्षणांनी भरलेला आहे….'
'उत्साही आणि चिंताग्रस्त, आशावादी हा चित्रपट विकी कौशलच्या शेवटच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसारखाच आहे.'
तर दुसऱ्याने लिहिले आहे, 'सध्या मी सॅम बहादूर पाहत आहे. उत्तेजित आणि चिंताग्रस्त. मला आशा आहे की विकी कौशलचा हा चित्रपट त्याच्या आधीच्या उरी चित्रपटाप्रमाणेच ब्लॉकबस्टर ठरेल.'
या सर्व प्रतिक्रिया पाहिल्यानंतर तर असे लक्षात येते की चाहत्यांना विकी कौशलच्या अभिनयाचे वेड लागले आहे.
मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहादूरमध्ये विक्की कौशलने देशातील पहिल्या फील्ड मार्शल सॅम माणेकशॉची भूमिका साकारली आहे.
तर सान्या मल्होत्राने विकीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेखने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची स्पर्धा रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटसोबत होणार आहे.
या दोन्ही चित्रपटांची जोरदार चर्चा आहे. आता सॅम बहादूरचा बॉक्स ऑफिस परफॉर्मन्स कसा असेल हे पाहावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.