Samantha In Politics News: भारतीय सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे समंथा. समंथाने आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप पाडली आहे.
समंथा आणि विजय देवराकोंडा यांचा कुशी सिनेमा रिलीज झालाय. कुशीला बॉक्स ऑफीसवर संमीश्र प्रतिसाद मिळालाय. सिनेमाची कारकीर्द चांगली सुरु असताना समंथा आता राजकारणात एन्ट्री घेणार आहे अशी चर्चा सुरु झालीय.
(samantha ruth prabhu enter in politics after kushi with Vijay Deverakond)
ब्रेकनंतर सामंथा राजकारणात प्रवेश करणार का?
नुकतंच समंथा रुथ प्रभूने अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेतल्याने तिच्या राजकीय कारकिर्दीबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. 'न्यूज 18' आणि 'इंडिया हेराल्ड'च्या वृत्तानुसार, समंथा आता राजकारणात येण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप समंथाने कोणताही अधिकृत घोषणा केली नाही. त्यामुळे आता समंथा राजकारणात येणार अशी दाट शक्यता निर्माण झालीय.
समंथा रुथ प्रभू नेहमीच सामाजिक भान जपत असते. ती नेहमीच शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. यापूर्वीही तिने तेलंगणातील जनता आणि शेतकऱ्यांना समर्थन दिलं होतं आहे. इतकंच नाही तर ती राज्याच्या हातमागाच्या कपड्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे.
सामंथा कोणत्या पक्षात सामील होऊ शकते?
मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या वृत्तानुसार समंथा रुथ के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये सामील होऊ शकते.
मात्र, अद्याप समंथा किंवा पक्षाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. त्यामुळे पुढच्या काही दिवसात याविषयीची चित्र स्पष्ट होईल.
समंथाला झालाय हा आजार
समंथा रुथ प्रभूने सध्या प्रकृतीच्या कारणामुळे अभिनयातून ब्रेक घेतला आहे. 'सिटाडेल'च्या शूटिंगनंतर तिने ही घोषणा केली होती. गेल्या वर्षी समंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर सांगितले होते की तिला ऑटो इम्यून डिसऑर्डर नावाचा आजार झाल्याचे निदान झाले आहे. यामुळे तिला सध्या अनेक प्रकारच्या त्रासातून जावे लागते. अशा परिस्थितीत तिने कामातून वेळ काढून स्वत:साठी वेळ काढला.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.