Samantha Ruth Prabhu Esakal
मनोरंजन

Samantha Ruth Prabhu: तो ब्रेक पडला महागात! समांथाचं झालं करोडोंचे नुकसान..

Vaishali Patil

Samantha Ruth Prabhu: मनोरंजन विश्वात सध्या साउथचा दरारा आहे. टॉलिवूडचे सिनेमांबरोबरच टॉलिवूडचे कलाकारही चर्चेत आहेत. त्यात साउथ अभिनेत्रींचीही खुपच चर्चा असते. साउथमध्ये अनेक सौदर्यंवती आहेत. त्यातील एक म्हणजे समांथा रुथ प्रभू.

समांथा ही तिच्या अभिनयाबरोबरचं सौदर्यंसाठीही लोकप्रिय आहे. तिच्या चाहत्यांची संख्याही कमी नाही. सध्या समांथा ही तिच्या आजारपणामुळे चर्चेत आहे. ऑटोइम्यून कंडिशन मायोसिटिस आजार ग्रस्त असेलेली समांथा सध्या तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करत आहे. तिने जवळपास सहा महिने कामातून ब्रेक घेतला आहे. नुकतच तिने तिच्या खुशी या चित्रपटाची शुटिंग पुर्ण केली आणि आता ती आराम करत आहे.

आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिच्या ब्रेकमुळे समांथाचे मोठे नुकसान झाले आहे. या कालावधीत तिचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याच्या चर्चा सोशल मिडियावर सुरु झाल्या आहेत.

सहा महिने ब्रेकवर गेलेल्या समांथाने तेलुगू, हिंदी आणि तमिळ भाषेतील कोणताही प्रोजेक्ट साइन करणार नसल्याचं सांगितलं आहे. ती सुट्टीवर गेल्यामुळे तिने निर्मात्यांची आगाऊ रक्कमही परत केल्याचे बोलले जात आहे.

मिडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं गेलं आहे की, समांथा एका चित्रपटासाठी सुमारे 3.5 ते 4 कोटी रुपये घेते. पण त्याने पहिले तीन चित्रपट साइन केले असल्याने त्याचे अंदाजे नुकसान 10 ते 12 कोटींच्या दरम्यान सांगितले जात आहे. तिने या चित्रपटांसाठी घेतलेले पैसे परत केले आहे.

तिने आधीच तीन चित्रपट साइन केले असल्याने, तिला 10 ते 12 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. समांथाने किमान सहा महिन्यांसाठी अभिनयातून एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावर्षी तिला तिच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. ती तिच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेईल आणि यूएस मध्ये तिच्या ऑटोइम्यून कंडिशन मायोसिटिससाठी उपचार सुरु आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2024: पुण्यातील बाप्पा असे होतील मार्गस्थ, गुरुजी तालीम सूर्य रथात तर तुळशीबाग जगन्नाथ पुरी रथात होणार विराजमान

Manoj Jarange Patil: "आरक्षण न दिल्यास उपमुख्यमंत्री फडणवीस जबाबदार असतील," मनोज जरांगे पाटील यांचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुढच्या वर्षी लवकर या अशी विनंती गणरायाला केली - अजित पवार

Ganpati Visarjan 2024 : परंपरेनुसार विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन कसे करावे?

BJP MLA fell on track: भाजपची महिला आमदार थोडक्यात बचावली, गर्दीत धक्का बसला अन् थेट रेल्वे रुळावर पडली; Video

SCROLL FOR NEXT