Samantha Ruth Prabhu 
मनोरंजन

'पुष्पा'मधील 'ऊ अंटावा' गाण्यासाठी समंथाने घेतलं तब्बल इतकं मानधन

समंथाच्या या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभूने (Samantha Ruth Prabhu) करिअरमधील पहिल्याच आयटम साँगची ऑफर स्वीकारली. अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मुख्य भूमिका असलेल्या 'पुष्पा' (Pushpa) या चित्रपटात समंथाचा हा आयटम साँग सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या गाण्यात समंथाचा बोल्ड लूक, तिचे हावभाव, नृत्यकौशल्य पाहून चाहते अवाक् झाले आहेत. समंथाने आतापर्यंत तिच्या करिअरमध्ये एकही आयटम साँग केलं नव्हतं. आता घटस्फोटानंतर तिने घेतलेल्या या निर्णयाची कलाविश्वात चांगलीच चर्चा झाली. अल्लू अर्जुनने समंथाला या गाण्याची ऑफर दिली तेव्हा तिने होकार देण्यासाठी बराच वेळ घेतला. अल्लू अर्जुनवर विश्वास ठेवत अखेर तिने ती ऑफर स्वीकारली. मात्र यासाठी तिने तगडं मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. (Oo Antava song)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. 'डॅडी मम्मी', 'रिंग रिंगा', 'सुपर माची' यांसारखी काही सुपरहिट गाणी त्यांनी इंडस्ट्रीला दिली आहेत. अल्लू अर्जुन आणि पुष्पा चित्रपटाची टीम काही महिन्यांपासून समंथाला या गाण्याची ऑफर देत होती. मात्र समंथाने ती वारंवार नाकारली. नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर तिने आयटम साँगची ऑफर स्वीकारल्याचं कळत होतं. त्यामुळे पतीमुळे ती गाण्याला नकार देत होती का, असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला होता. या गाण्यासाठी समंथाने एक-दोन नव्हे तर तब्बल पाच कोटी रुपये मानधन घेतल्याचं समजतंय. प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्यने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. तर गायक कनिका कपूरने हिंदी व्हर्जनमधील गाणं गायलं आहे. रकीब अलमने हिंदी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

एका कार्यक्रमात समंथाचे आभार मानत अल्लू अर्जुन म्हणाला, 'गाण्याला होकार देण्यासाठी तुझे खूप खूप आभार. मला माहितीये, सेटवर तुझ्या डोक्यात किती प्रश्न होते. हे गाणं करणं योग्य असेल की नसेल अशा संभ्रमात तू होतीस. त्यावेळी मी तुला फक्त एकच गोष्ट सांगितली. ती म्हणजे, माझ्यावर विश्वास ठेव आणि हे गाणं कर. त्यानंतर तू मला एकही प्रश्न विचारला नाहीस. माझ्यावर आणि चित्रपटाच्या टीमवर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद. तू माझं मन जिंकलंस. ओ अंटावा हे गाणं जगभरात पहिल्या क्रमांकावर आहे, त्याबद्दल तुझं अभिनंदन.' अल्लू अर्जुनच्या या वक्तव्यानंतर समंथानेही ट्विट केलं. 'आता मी नेहमीच तुझ्यावर विश्वास ठेवीन', असं ती म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT